रुपयाचे कोसळणे चालूच; व्याजदरवाढ शक्‍य 

योग्य मूल्यावर रुपया स्थिरावणार असल्याचे सरकारचे तुणतुणे चालूच 
दरम्यान, रिझर्व्ह बॅंक काही प्रमाणात हस्तक्षेप करीत असल्याचे वृत्त आहे. तरीही रुपयाचे कोसळणे चालूच आहे. आजही रुपयाचे मूल्य 37 पैशांनी कमी होऊन 71.58 रुपये प्रति डॉलर या नव्या नीचांकावर गेले. आता केंद्र सरकार परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एखाद्या योजनेवर विचार करण्याची शक्‍यता आहे. अनिवासी भारतीयाकडून ठेवी आकर्षित करण्याचा प्रयोग रिझर्व्ह बॅंकेने या अगोदर दोन वेळा केला आहे. तो प्रयोग आता पुन्हा केला जाण्याची शक्‍यता आहे. 
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यात वेगाने घट होत आहे. जागतिक परिस्थितीमुळे तसे होत आहे. जर रुपयाचे मूल्य आणखी कमी होत गेले तर रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरवाढीच्या शक्‍यतेवर विचार करावा लागणार असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुपया आणखी जास्त घसरण्याची शक्‍यता अधिक असल्याचे स्टेट बॅंकेच्या इकोरॅप या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
क्रुडचे वाढणारे दर आणि व्यापारयुद्ध व अमेरिकेकडून होत असलेली व्याजदरवाढ या कारणामुळे रुपया घसरत आहे. या परिस्थितीत नजीकच्या काळात फार फरक पडण्याची शक्‍यता कमी आहे. इतक्‍या कमी वेळेत परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास कमी वाव असतो. त्यामुळे रुपयाला सावरण्यासाठी प्रसंगी बॅंकेला व्याजदर वाढ करावी लागणार असल्याचे स्टेट बॅंकेच्या या अहवालात नमून करण्यात आले आहे.
जून महिन्यापासून रुपयाच्या मूल्यात तब्बल 6.2 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. या काळात अनेक वेळा डॉलर विकून आणि इतर उपाययोजना करून बॅंकेने रुपयाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, फरक पडलेला नाही. दरम्यानच्या काळात बॅंकेने दोन वेळा व्याजदरात वाढ केली आहे. आता पुन्हा त्या शक्‍यतेवर बॅंकेला विचार करावा लागणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
रुपयाच्या मूल्याला जागतिक पातळीवर दीर्घपल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आयात आणि निर्यातीवर होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रुपयाच्या मूल्याला कोणत्या तरी पातळीवर स्थिर करण्याची गरज वाढली आहे. तशी मागणी आयात करणाऱ्या कंपन्या करीत आहेत.
दरम्यान, सरकारकडून रुपयाबाबत जुने स्पष्टीकरण आजही चालू राहिले. अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रुपयाचे मूल्य देशातील नाही तर परदेशातील कारणामुळे कमी होत आहे. त्यामुळे सरकारला हस्तक्षेपास कमी वाव आहे. रुपाया योग्य वेळी योग्य मूल्यावर स्थिरावेल, असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुपया घसरत असल्यामुळे केवळ आयात-निर्यातीवर नकारात्मक परिणाम झालेला नाही तर त्याचा एकूणच भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. भारताला दीर्घ पल्ल्यात वाढीव विकासदर साध्य करायचा असेल तर या आघाडीवर शक्‍य तितक्‍या लवकर स्थिरता येण्याची गरज आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)