रुपयांची घसरण, मंदीचे कारण

आयात होणारा कच्चा माल महागला ः इंधनाने वाढवला उत्‍पादन खर्च
पिंपरी – गेल्या वर्षभरात रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत-घसरत 74 रुपयांपर्यंत येऊन पोहचला आहे. एका वर्षामध्ये 58 ते 74 अर्थात प्रत्येक डॉलरमागे तब्बल 16 रुपयांचे अंतर पडले आहे. 16 रुपयांचे अंतर उद्योगांसाठी अतिशय नुकसानदायक ठरत आहे. पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रीकल्चर या औद्योगिक संघटनेने सध्याची मंदी आणि तोट्यात चालेल्या उद्योगांच्या कारणांचे विश्‍लेषण केले आहे. यात प्रामुख्याने रुपयांची घसरण, महाग झालेले स्टील, वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर या सर्व बाबी लवकरात-लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.

चेंबरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड व आसपासच्या परिसरात असलेले लघु आणि मध्यम उद्योजकांना मोठ्या कंपन्यांकडून एकदाच त्यांच्या उत्पादनाचा दर निश्‍चित करून दिला जातो. प्रतिस्पर्धेच्या या युगात हा दर देखील खूप कमी असतो. अशातच कच्चा माल महागल्यास लघु आणि मध्यम उद्योजकांची मोठी तारांबळ उडते. बड्या कंपन्या कच्च्या मालाच्या दरांनुसार दर वाढवून देत नाहीत, दुसरीकडे रुपयांची घसरणीमुळे सातत्याने कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहे. तसेच पेट्रोल-डिझेल, वीज महागल्याने उद्योजकांच्या तोट्यात आणखीच भर पडत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

17.46 टक्‍के रक्‍कम अधिक
पिंपरी-चिंचवड शहर हे ऑटोमोबाईल उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. बहुतेक लघु आणि मध्यम उद्योजक बड्या कंपन्यांना सुटे पार्टस सप्लाय करतात. गेल्या वर्षभरात प्रत्येक डॉलरमागे 16 रुपये अधिक द्यावे लागत असल्याने 17.46 टक्‍के उद्योजकांना जास्त मोजावे लागतात. औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी मशिनरीज, सुट्टे भाग, इलेक्‍ट्रॉनिक उत्पादने यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत कच्चा केवळ रुपयाच्या घसरणीमुळे 17.46 टक्‍क्‍यांनी महागला आहे. याव्यतिरिक्‍त इतर कारणांनीही कच्चा माल महागच होत चालला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्योगांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे स्टील, लोखंड हे औद्योगिक व ऑटोमोबाईल उत्पादकांचा मुख्य घटक आहे.

सवलतींची खैरात ही जबाबदार
चेंबरने आरोप केला आहे की, आज चीनशी व परदेशी कंपन्यांशी सरकारने अनेक आंतरराष्ट्रीय करारनामे करून सवलतींची खैरात केल्याने स्थानिक उद्योगांना तोट्याच्या दिशेने वाटचाल करावी लागत आहे. रुपयांची घसरण झाल्याने केवळ आयटी कंपन्यांना फायदा होतो. देशातील आयटी कंपन्यांपैकी 75 टक्‍के कंपन्या परदेशी आहेत. उलटपक्षी परदेशी कंपन्यांचा नफा वाढतो, तर देशी उद्योग, व्यापार, शेती उतादकांना लाखो-कोटींचा तोटा सहन करणे म्हणजे स्वदेशी उद्योगांना मंदीकडे वेगाने झुकलेले दृष्टीत येत आहे.

इंधनाच्या दराने आणले जेरीस
चेंबरने दिलेल्या माहितीनुसार उद्योगांना सध्याचे इंधन दर देखील त्रासदायक ठरत आहेत. इंधन दरांमध्ये झालेल्या 37 टक्‍क्‍यांच वाढीने उद्योगांना जेरीस आणले आहे. सरकारने इंधन जीएसटीऐवजी व्हॅटमध्ये ठेवले आहे. चेंबरने कच्च्या तेलाचे विक्रीत रुपांतराचा खर्च देखील सादर केला असून सर्व कर व खर्च लावून देखील पेट्रोल सुमारे 67 रुपये लिटरने मिळू शकते, असा दावा केला आहे व सरकार सुमारे प्रत्येक लिटरमागे सुमारे 18 रुपये नफाखोरी करत असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)