रुग्ण कल्याण नियामक समित्यांची आढावा बैठक

पुणे – राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण नियामक समित्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली. रुग्णांच्या उपचारासाठी येणारा निधी आरोग्य शिबीर आणि अत्यावश्‍यक औषध खरेदीसाठी वापरावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने, जिल्हा क्षयरोग अधिकारी संजय दराडे, डॉ. एन. जी. ढवळे आदी उपस्थित होते. सुरुवातीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गेल्या आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेतला. या वर्षातील नियोजनाप्रमाणे खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

-Ads-

उरो रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, कुष्ठरोग रुग्णालय यांच्या खर्चाचा आढावा घेतला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, नियमित लसीकरण, आशा योजना, महत्त्वाचे आजार नियंत्रण कार्यक्रम याशिवाय माता बाल संगोपन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना यांचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 539 उपकेंद्रे, 13 आयुर्वेदीक दवाखाने, 26 ग्रामीण रुग्णालये, 3 तरंगते दवाखाने, 11 आरोग्य पथके कार्यरत असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)