रुग्णाला नुकसानभरपाई तरतुदीला डॉक्‍टरांचा विरोध

उपचारादरम्यान हानी झाल्यास रुग्णाला भरपाई किंवा डॉक्‍टरांना दंड


“आयएमए’ उद्या पाळणार निषेध दिन

पुणे – रुग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या डॉक्‍टराकडून कोणतीही हानी झाल्यास त्यांच्याविरोधात रुग्णाला भरपाई अथवा दंडाची रक्कम वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हास्तरावर 10 लाख ते एक कोटी आणि राज्यस्तरावर एक कोटी ते 10 कोटीपर्यंतची दंड करण्याची तरतूद करण्यात आल्याने त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राष्ट्रीय शाखेने त्याला विरोध केला आहे. या संदर्भात खासदारांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्राहक सरंक्षण कायद्यांतर्गत लोकसभेत नुकतीच सुधारणा मान्य करण्यात आली. त्यानंतर आता हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राज्यसभेत पाठविण्यात येणार आहे. त्यात मंजूर झाल्यास त्याची देशभर अंमलबजावणी होईल. मात्र, या विधेयकातील दुरुस्तीला राष्ट्रीय पातळीवरील “आयएमए’च्या शाखेने विरोध केला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली अस्तित्वात आला. 1994 त्यानंतर मध्ये पुन्हा तो नव्याने आला. आता त्यात सुधारणा करण्यात येत आहे. लोकसभेत दुरुस्ती करण्यात आलेल्या विधेयकामध्ये ही दुरूस्ती करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतू, त्याला “आयएमए’ने विरोध करत, दंडात्मक अथवा नुकसान भरपाईची मर्यादा वाढविल्यास डॉक्‍टरांना “इन्डेम्निटी इन्शुरन्स’चा (प्रॅक्‍टिसमध्ये काही झाल्यास) प्रीमियमदेखील वाढण्याची शक्‍यता असते. तो प्रीमियम कोठून भरणार असा सवाल करण्यात आला आहे. अखेर पेशंटच्या तपासणी शुल्कावर परिणाम होईल. ग्राहक सरंक्षण कायदा वैद्यकीय क्षेत्रासाठी लागू झाला तेव्हापासून डॉक्‍टरांनी “डिफेन्सिव्ह प्रॅक्‍टिस’ सुरू केली आहे. दंडात्मक तरतूद वाढविण्यास आमचा विरोध असून दंडाची रकमेची मर्यादी कमी करावी, अशी मागणी राज्य “आयएमए’चे सचिव डॉ. सुहास पिंगळे यांनी केली. या कायद्यात कौन्सिल कमिशन नेमण्याची तरतूद केली आहे. मात्र, त्यांची पात्रता, निवड प्रक्रिया याबाबत स्पष्टता केली नाही. त्यातून ब्लॅकमेल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, ग्राहक संरक्षण हक्क कायद्यातील बदल, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या विधेयकामध्ये असलेल्या तरतुदीला विरोध म्हणून येत्या 4 जानेवारी रोजी निषेध दिन पाळण्यात येणार आहे. असे राज्य शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)