रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या माय-लेकावर गुन्हा

चिंचवड – पतीच्या उपचाराची कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाने रूग्णालयात आरडाओरड करीत गोंधळ घातला. तसेच डॉक्‍टर महिलेचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 23) दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड येथील निरायम रूग्णालयात घडला.

निरायम रूग्णालयातील महिला डॉक्‍टरने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनुज कनवलराज डॅंग (वय-27) व त्याची आई या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पतीने निरामय रूग्णालयात उपचार घेतले होते. त्या उपचाराची कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी महिला व तिचा मुलगा अनुज शुक्रवारी रूग्णालयात आले होते.

उपचाराची कागदपत्रे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना त्यांनी मागितली. डॉक्‍टरांनी कागदपत्रे संबंधित टेबलवरून घेऊन जाण्यास सांगितले.तेथील महिलेशी कागदपत्रे घेताना त्या महिलेचा व तिच्या मुलाचा वाद झाल्याने दोघांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत आरडाओरड केली. फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल घेऊन पसार झाले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)