रुग्णालयांच्या सुरक्षेचा निधी अंदाजपत्रकातच

आरोग्य विभागाची अनास्था : रुग्ण सुरक्षा वाऱ्यावर

पुणे – महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे आणि अग्नीशमन यंत्रणा उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली रक्‍कम खर्चीच पडली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी वाया जाणार असल्याचे चित्र आहे.

-Ads-

शहरात महापालिकेची सुमारे 67 रुग्णालये आणि दवाखाने आहेत. या ठिकाणी आलेल्या रुग्णांची तसेच डॉक्‍टरांची सुरक्षा लक्षात घेऊन 2018-19 च्या अंदाजपत्रकात सुमारे 1 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार महापालिकेच्या वर्दळ अधीक असलेल्या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा बसविणे आवश्‍यक होते. मात्र, अंदाजपत्रक सुरू होऊन दहा महिने झाले तरी अद्याप आरोग्य विभागाकडून या निधीतून ही यंत्रणा घेण्यासाठी साधा प्रस्तावही तयार केलेला नसल्याचे समोर आले आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता काहीच झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा निधी वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून रुग्ण तसेच रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचा आणखी एक प्रशासकीय उदासिनतेचे उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)