रुग्णालयांची अचानक तपासणी गरजेची

रेडा- गरीब रूग्णांवर औषधोपचार करताना काही रूग्णालये टाळाटाळ करतात. या रूग्णालयांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर चाप बसविणे ही काळाची गरज आहे. एकवेळ तुम्ही काशीला जावू नका मात्र सर्वसामान्यांचे अनमोल प्राण वाचविण्यास प्रामाणिकपणे मदत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार तथा धर्मदाय समितीचे प्रदेश सदस्य दत्तात्रय भरणे यांनी केले.
शासनाच्या डिजीटल महाराष्ट्र योजनेअंतर्गत पुणे विभाग धर्मदाय आयुक्त कार्यालय, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, इंदापूर आरोग्य संदेश प्रतिष्ठान, नेहरू युवा केंद्राच्या वतीने येथील डॉ. नितू मांडके सभागृहात विश्‍वस्त व धर्मादाय आयुक्‍त एक मुक्त संवाद या एकदिवसीय परिषदेचे उद्‌घाटन भरणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, हुमड जैन फेडरेशनचे अध्यक्ष सुशिल शहा, महामंत्री मिहिर गांधी, मंगेश दोशी, डॉ. लहू कदम, डॉ. संजय शहा, डॉ. समीर मगर, डॉ. सुश्रूत शहा उपस्थित होते. यावेळी आई सामाजिक फाउंडेशनच्या शुभांगी धायगुडे, नवनाथ धायगुडे, शशिकांत शहा यांचा सत्कार झाला.
आमदार भरणे म्हणाले की, गरीब रूग्णांसाठी शासनाने विविध रूग्णालयात 10 टक्के खाटा राखून ठेवल्या असून रूग्णांवर मोफत उपचार होतात. इंदापूर तालुक्‍यातील एका रूग्णाचे 16 लाख रूपयांचे रूग्णालयाचे बील नुकतेच माफ झाले आहे. धर्मदाय समितीचा जिल्ह्यात सर्वाधिक लाभ इंदापूर तालुक्‍यास मिळाला असून हे सेवेचे व पुण्य कमविण्याचे मोठे माध्यम आहे. धर्मदाय कार्यालयाच्या योजना लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी संयोजकांनी आदर्श व अनुकरणीय उपक्रम राबविला आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे.
दिलीप देशमुख म्हणाले, सर्वसामान्यांच्या आरोग्य समस्या निवारण करण्यासाठी 30 कोटी रूपयांचा निधी दिल्याने अनेकांना जीवदान मिळाले. रूग्णालयात सुविधा पुरविण्यासाठी कंपन्याचा शिल्लक कोट्यवधी रूपयांचा सीएसआर फंड गरीब रूग्ण निधी मध्ये वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास अनेक समस्या सोडविणे सोपे जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
224 :thumbsup:
54 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)