रुग्णांवर ऑनलाइन किंवा फोनवर उपचार थांबवा

इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्‍टरांना आवाहन

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.7 – रुग्णांना फोनवरुन किंवा ऑनलाइन पद्धतीने औषधोपचार केल्याने रुग्ण दगावल्याचे प्रकरण नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशनने अशा प्रकारे “फोनवरुन किंवा ऑनलाइन उपचार करू नये,’ असे आवाहन देशभरातील डॉक्‍टरांना केले आहे.
रुग्णाला प्रत्यक्ष न तपासता दूरध्वनीद्वारे रुग्णाशी बोलून, त्याच्या आजाराची लक्षणे जाणून घेत त्यांना औषधे देणे हे धोकादायक आहे. रत्नागिरी येथील एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी स्थानिक डॉक्‍टर दाम्पत्याविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने डॉक्‍टरांनाफटकारले आहे. रत्नागिरी येथील महिलेला प्रसूतीनंतर घरी सोडण्यात आले. काही दिवसांनी तिच्या प्रकृतीत अस्वास्थामुळे तिला पुन्हा रुग्णालयात आणले असता डॉक्‍टर उपलब्ध नव्हते. मात्र परिचारिकेला दूरध्वनीवरुन सूचना देऊन त्यांनी महिलेवर उपचार केले. त्यातच महिलेचा अंत झाला.
शहरी भागातही अनेकदा रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे किंवा डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारे फोनवरुन औषधोपचार केल्याचे आढळते त्यामुळेच असे प्रकार वेळीच टाळणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फोनवरुन उपचार देणे हे डॉक्‍टर तसेच संस्थेच्या नैतिकतेच्या विरोधात आहे. यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळेच डॉक्‍टरांनी यापासून वेळीच धडा घेऊन अशी उपचार पद्धती थांबविणे गरजेचे आहे.
– डॉ. रवि वानखेडकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)