रुग्णांची माहिती ऑनलाईन पण मग गोपनीयतेचे काय?

आरोग्य विभागाच्या हेल्थ इन्फॉर्मेशन एक्‍सचेंजबाबत डॉक्‍टरांचा सवाल
पुणे – एकीकडे रुग्णाची गोपनीय माहिती लीक झाली तर डॉक्‍टरांना पाच लाख रुपये दंड किंवा पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे तर दुसरीकडे राज्याच्या ऑनलाईन हेल्थ पोर्टलवर एकूणएक सर्व रुग्णांची माहिती भरण्याचे आदेश द्यायचे अशा प्रकारचे विसंगत आदेश शासनाकडून देण्यात आल्याने आता नेमके करावे काय असा प्रश्‍न राज्यातील डॉक्‍टरांना पडला आहे.
आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिशा या कायद्याचा मसुदा सादर केला असून त्यासाठी सूचना मागविण्यात आल्या होत्या. या कायद्यानुसार राष्ट्रीय ई हेल्थ प्राधिकण व राज्यस्थरीय ई हेल्थ प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. या प्राधिकरणामध्ये आरोग्य विषयक माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी हेल्थ इन्फॉर्मेशन एक्‍सचेंज (एचआयई) ही संगणक प्रणाली असणार आहे. डॉक्‍टरर्स, छोटे क्‍लिनिक, रुग्णालये यांना या संगणक प्रणालीमध्ये रुग्णांची माहिती भरावी लागणार आहे. अगदी सर्दी खोकला सारख्या छोट्या आजासाठी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाची माहिती देखील डॉक्‍टरांना यात भरावी लागणार आहे. ही माहिती रुग्ण अथवा त्यांनी परवागनी दिलेल्या आरोग्य संस्थांना एका क्‍लिकवर पहाता येईल. त्याबरोबरच माहितीचा उपयोग संशोधनांसाठीही केला जाईल. मात्र या सगळ्यात आरोग्य कायद्यात नमूद असल्याप्रमाणे रुग्णाची माहिती गोपनीय ठेवणे हे डॉक्‍टरांवर बंधनकारक आहे. ही गोपनीय माहिती बाहेर आली तर कायद्यात डॉक्‍टरांच्या शिक्षेसाठी पाच लाख रुपये दंड किंवा पाच वर्षे कारावासाची शिक्षा आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्‍टरांच्या संघटनेने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असून सकराने याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान सध्या आधारपासून फेसबुकपर्यंत सर्व प्रकारची माहिती लीक होत असताना अशा प्रकारची माहितीच्या गोपनीयतेची जबाबदारी आमच्यावर असू नये अशीही मागणी आयएमएने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)