रिसेलचे घर घेणे फायदेशीर (भाग-२)

राहण्यासाठी घर घेताना बाजारभाव आणि बजेटचे गणित जमत नसल्यास रिसेलचे घर घेणे अनेक दृष्टींनी फायद्याचे ठरते. एकतर लगेच ताबा मिळत असल्यामुळे एकीकडे बॅंकेचे हप्ते आणि दुसरीकडे घरभाडे हा दुहेरी खर्च टळतो. शिवाय, अनेक उपकरणे, फिटिंग्ज तयार असतात. मात्र, रिसेलचे घर खरेदी करताना काही गोष्टींची पडताळणी करणेही गरजेचे असते.

रिसेलचे घर घेणे फायदेशीर (भाग-१)

घरांच्या वाढत्या किमतींमुळे आपल्या उत्पन्नाच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या व्यक्ती रिसेल घरांच्या बाजाराकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. अनेकांना रिसेलची घरे घेणे भाग पडत आहे. रिसेलमध्ये चांगल्या प्रतीचे बांधकाम असलेले घर कमी किमतीत मिळू शकते. रिसेल बाजारात विकली जाणारी घरे लगेच हस्तांतर करण्यासाठी आणि राहायला जाण्यासाठी तयार असतात. या घरांमध्ये फिटिंग्ज आणि अनेक उपकरणेही तयार असतात. याखेरीज रिसेलचे घर घेतल्याने आणखीही काही मार्गांनी पैशांची बचत होते. नवीन प्रकल्पात फ्लॅट घेतल्यानंतर एकीकडे महागड्या दराने घेतलेल्या कर्जाचे हप्ते (ईएमआय) सुरू होतात आणि दुसरीकडे घरभाडेही भरावे लागते. हा दुहेरी खर्च रिसेलचा फ्लॅट घेऊन वाचविता येऊ शकतो, कारण त्या घरात लगेच राहायला जाता येते. दुहेरी खर्च वाचविता येतो. याखेरीज पहिल्या ईएमआयपासूनच करसवलतीचाही लाभ घेता येतो. रिसेलच्या घरात लगेच शिफ्ट होता येते, कारण खरेदी व्यवहारानंतर लगेच ताबा मिळतो. त्याऐवजी जर एखाद्या तयार होत असलेल्या प्रकल्पात फ्लॅट घेतला, तर कमीत कमी सहा महिने वाट पाहावी लागते. त्यानंतरही तो फ्लॅट राहण्यायोग्य करण्यासाठी अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात आणि त्यात वेळही बराच जातो. रिसेलचे घर घेतल्यास यातील अनेक गोष्टी वाचतात.

-Ads-

रिसेलचे घर घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. नव्या घरासाठी पैसा गुंतविताना ज्याप्रमाणे आपण सर्व दस्तावेजांकडे लक्षपूर्वक पाहतो, त्याचप्रमाणे रिसेल घराचे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत का, याची खातरजमा करून घ्यावी लागते. रिसेलच्या घरावर कोणतेही कर्ज नाही, याची खात्री करून घ्यावी. कारण तसे असल्यास घर खरेदी करणाऱ्यावर त्याची जबाबदारी येते. घर खरेदी करण्यापूर्वी त्या घराची परिस्थिती व्यवस्थित पाहून घ्यावी. बांधकामाची प्रत आणि अन्य सर्व गोष्टींकडे डोळसपणे पाहावे. आपल्याला रिसेलचे घर विकणाराच त्या घराचा निर्वेध मालक असल्याची खात्री करून घ्यावी. त्या घरावरून नंतर कोणताही विवाद उभा राहणार नाही, याची खात्री असायला हवी. विक्रेता आपले घर कोणत्या कारणासाठी विकत आहे, याची पडताळणी करून घेणे चांगले. संबंधिताने जर ते घर गुंतवणूक म्हणून घेतलेले असेल, तर तो त्यावर नफा कमावणार, हे निश्‍चित आहे. त्यामुळे चालू दराने खरेदी करताना रिसेलचा फ्लॅट नव्या फ्लॅटच्या तुलनेत स्वस्त मिळतो आहे का, हे पाहावे. जर विक्रेत्याने घर

स्वतःच्या निवासासाठी घेतलेले असेल आणि आता तो ते विकत असेल, तर विक्री करण्यामागची कारणे अधिक डोळसपणे तपासावीत. त्या घराच्या संदर्भात कोणतीही समस्या असू शकते. कामाच्या दर्जापासून कर्जापर्यंत कोणतीही समस्या असल्यास त्याची माहिती घ्यावी.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)