शॉर्ट फिल्म कॉर्नर : रिसायकल – डोण्ट ट्रॅश अवर फ्युचर

आज आपल्याकडे कचऱ्याची गंभीर समस्या आहे. त्यातही प्लॅस्टिक कचरा तर कधीही न सुटणारा प्रश्‍न बनला आहे. दिवसेंदिवस प्लॅस्टिकचा कचरा वाढत असून यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. संपूर्ण जगात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. परंतु वापरा आणि फेका या सवयीमुळे प्लॅस्टिक कचरा वाढत असून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाकडेही ठोस उपाययोजना नाहीत. यामुळे प्लॅस्टिकच्या कच-याच्या समस्येने भीषण रूप धारण केले आहे. यासाठी समाजसेवी संस्थाकडून वेळोवेळी समाजात जागृती करण्याचे काम करत असतात. कचऱ्याला पायबंद बसण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजनाही सध्या राबविण्यात येत आहेत. याच समस्येवर ही लघुकथा आहे.

या लघुकथेची सुरुवात एका सफाई कर्मचाऱ्यापासून होते. हा कर्मचारी रस्त्यावरील कचरा साफ करत असतो. तेवढ्यात एक चारचाकी गाडी येते व त्यातून एक लहान मुलगी उतरते व आपल्या हातातील कचऱ्याची बॅग रस्त्यावर टाकते. ती बॅग तो सफाई कर्मचारी आपल्या घरी घेऊन जातो. त्या पिशवीमधील उरलेले खाद्यपदार्थ आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना देतो. त्यातच एक प्लॅस्टिकची बाटलीही असते. त्या प्लॅस्टिकच्या बाटलीला कलर करून त्यामध्ये बिया टाकतो. व रोज त्याला पाणी घालतो. काही दिवसांनी त्याचे रोपटे तयार होते.

पुन्हा तीच चारचाकी गाडी येते व त्यातून ती लहान मुलगी परत एक कचऱ्याची पिशवी घेऊन उतरते. यावेळी तो सफाई कर्मचारी त्या लहान मुलीच्या हातातील पिशवी घेतो आणि त्याने तयार केलेले रोपटे तिला देतो. ते रोपटे त्या लहान मुलीला एवढे आवडते कि ती ते घरी घेऊन जाते.

कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पुर्नवापर हाच एक पर्याय आहे. आज समाजात अनेक व्यक्ती अशा आहेत ज्या कचऱ्याचा पुर्नवापर करून यशस्वी व्यवसाय करत आहेत. आणि त्यातून उत्तम नफा मिळवत आहेत. प्रत्येकाने जर आपल्या घरातील कचरा घरातच विघटीत किंवा त्याचा पुर्नवापर केला तर बऱ्याच प्रमाणात कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास यश येईल.

‘Let’s Recycle for a better tomorrow’

युट्यूब लिंक – https://youtu.be/Id8NHDAmsyU

– श्‍वेता शिगवण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)