रिव्हर सायक्‍लोथॉनमध्ये सात हजार पर्यावरण प्रेमींचा सहभाग

पिंपरी –स्वच्छ भारत अभियान आणि नमामि गंगा अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी “रिव्हर सायक्‍लोथॉन 2018′ अभियानाला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते भोसरीतील गावजत्रा मैदानावर या अभियानाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.

“अपने अंदर यह जोश भरो, नदियों को अब साफ करो’ असे फलक दाखवून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली. तीनही फेरींचे ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुर्तफा मानवी साखळी करुन तर महिला, भगिनींनी चौकाचौकात रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत केले. या अभियानातंर्गत शहरातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत तेवीस हजार व चित्रकला स्पर्धेत सेहचाळीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

-Ads-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या पाण्याने अभिषेक करुन सायक्‍लोथॉनचे उद्‌घाटन करण्यात आले. यामध्ये दहा किलोमीटरच्या फेरीला महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते, पंधरा किलोमीटरच्या फेरीला अंजली भागवत यांच्या हस्ते पंचवीस किलोमीटरच्या फेरीला आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. पंचवीस किलोमीटरच्या फेरीचे नेतृत्व पै. सचिन लांडगे, पंधरा किलोमीटरचे नेतृत्व आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर आणि दहा किलोमीटरच्या फेरीचे नेतृत्व शहर सुधारणा समितीचे सभापती राहुल गवळी यांनी केले.
या सायक्‍लोथॉनमध्ये सहा हजार सातशे सायकल प्रेमींनी ऑनलाईन, तर स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडे आठशे सायकल प्रेमींनी नोंदणी केली होती. राज्यात प्रथमच सात हजारांहून जास्त सायकल प्रेमींनी सहभाग घेतलेल्या रिव्हर सायक्‍लोथॉन रॅली मधील उत्साह ऑलिम्पिंकचे आठवण करुन देणार आहे, असे अंजली भागवत यांनी शुभेच्छा देताना सांगितले. बाल सायकलपटूंपासून ऐशीहून जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सर्वांना प्रमाणपत्र, पदक, तुळशीचे रोप, टि शर्ट, टोपी देण्यात आली. लकी ड्रॉ विजेत्या सायकल प्रेमींना एसएसएस सायकल वर्ल्ड यांच्या वतीने सायकल भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेची सेवा रुबी एल केअर रुग्णालयाने दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातशेहून जास्त स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, महापालिकेच्या ऍम्बॅसिटर अंजली भागवत, राष्ट्रीय खेळाडू पूजा शेलार, निता रजपुत, रिव्हर सायक्‍लोथॉनचे निमंत्रक सचिन लांडगे, नगरसेविका भिमाताई फुगे, हिरानानी घुले, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, सायकल मित्र पुणे संस्थेचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)