“रिव्हर वॉक’द्वारे उलगडला मुठाईचा उगम प्रवास

“जिवित नदी फाउंडेशन’तर्फे “नदी फेरफटका’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – पुणे महापालिका आणि “जिवित नदी फाउंडेशन’ यांच्यावतीने शनिवारी “मुठाई नदी फेरफटका’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि शीतल उगले, उपायुक्त सुनील गायकवाड, अनिल मुळे, श्रीनिवास कंदूल, किशोरी शिंदे, संदीप कदम, अरुण खिलारी, युनूस पठाण, दीपक माळी, ज्ञानेश्‍वर मोळक आदी उपस्थित होते.

जिवित नदी फाउंडेशनच्या संस्थापिका शैलजा देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुठाई नदीच्या उगमापासून ते संगम आणि बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंतचा प्रवास आणि तपशील सांगितला. नदीचे मूळ ते कूळ सांगत प्रदूषणाची पाळेमुळे आपल्या घरापर्यंत कशी पोहोचली आहेत, हे सांगतानाच पुण्याचा इतिहासही त्यांनी कथन केला.

जैविक, पौराणिक, ऐतिहासिक आणि पुण्याचा सांस्कृतिक वारसा, पटवर्धन समाधी, केळकर समाधी यांची माहितीही याठिकाणी देण्यात आली. झाशीची राणीने जो मार्ग जाण्या-येण्यासाठी वापरला त्याचा अनुभव उपस्थितांना यामध्ये घेता आला.

आपल्या शरीरामध्ये 70 टक्‍के पाणी असते आणि ते या नद्याच आपल्याला देतात. एका अर्थी या नद्या आपल्या आईसारख्या असतात. त्यामुळे त्यांची जपवणूक आपण करायला नको का, असा प्रश्‍नही यावेळी विचारला. रासायनिक गोष्टींचा वापर टाळता येत नसला तरी तो कमी करावा, ज्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होईल, असे सांगतानाच प्रती व्यक्ती 40 ग्रॅम रासायनिक द्रव्य नदीमध्ये सोडले जाते. पुण्याच्या लोकसंख्येचा विचार करता जवळपास दोन लाख किलो रासायनिक पदार्थ दररोज नदीमध्ये मिसळतात, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. यासाठी जिवित नदीमार्फत सेंद्रीय गोष्टींचा वापर करण्याचा आग्रह धरला जात आहे.

यासाठी गृहोपयोगी वस्तू तयार केल्या जातात आणि त्याचे उत्पन्न घरच्या घरी कसे करायचे याचे प्रशिक्षणही संस्थेमार्फत दिले जाते. यामुळे एका कुटुंबामागे सातशे ते आठशे रुपयांची बचत होते. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याबद्दल आयुक्त राव यांनी संस्थेचे कौतुक केले. याविषयात महापालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासनही दिले. नदीच्या पर्यावरणाच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व संस्थांची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या सूचनांचा एकत्रित विचार करून महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात यासाठी तरतूद करण्यात येईल, असे आश्‍वासन राव यांनी यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)