रिल लाईफमध्येच नाहीतर रिअल लाईफमध्येही अमिताभ बच्चन हिरो

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन केवळ अॅक्टिंगमध्येच किंग नसून सामाजिक कार्यातही किंग ठरले आहेत. देशातील अनेक दुर्घटनांवेळी अमिताभ बच्चन यांनी मदत केली आहे. आता अमिताभ बच्चन शेतकऱ्यांसाठी आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठीही पुढे सरसावले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या १० व्या सीझनच्या पत्रकार परिषदेवेळी बिग बींनी ही माहिती स्वतः दिली.

अमिताभ बच्चन यांनी म्हंटले कि, सातत्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे मी चिंतीत झालो होतो. यामुळेच त्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला, असेही त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत ५० शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. तसेच बँकांकडून अन्य २०० शेतकऱ्यांची कर्जाच्या रकमेची माहिती मिळाल्यानंतर १.२५ कोटींची रक्कम मदत स्वरूपात दिली आहे. केवळ शेतकऱ्यांनीच नाहीतर शहीदांच्या कुटुंबियांनाही अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे अमिताभ बच्चन रिल लाईफमध्येच हिरो नसून रिअल लाईफमध्येही हिरो ठरले आहेत.

दरम्यान, याआधीही केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक व आवश्यक वस्तूंची मदत केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)