रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: डॉन बॉस्को, अँग्लो उर्दू हायस्कूलचे विजय

पुणे: डॉन बॉस्को हायस्कूल आणि अँग्लो उर्दू हायस्कूल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर वेगवेगळ्या शैलीत मात करताना रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला. तसेच सरदार दस्तूर होशांग बॉईज हायस्कूल, अमनोरा स्कूल, जय हिंद स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एसएनबीपी मोरवाडी आणि कमलनयन बजाज हायस्कूल या संघांनीही चमकदार विजयासह आपली आगेकूच कायम राखली.

डेनोबिल्ली कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील शालेय मुलींच्या गटात डॉन बॉस्को हायस्कूलने मदर टेरेसा स्कूलवर 5-0ने मात केली. यात रिटा देसाने (5, 12 व 36वे मि.) तीन गोल नोंदविले, तर लव्हिना मस्कारेन्हास (6वे मि.) आणि सानिका तायडे (29वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करताना तिला सुरेख साथ दिली.

-Ads-

मुलांच्या गटात अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलने समता बालक मंदिर स्कूलवर 5-0ने विजय मिळवला. यात अर्शद खानने (43, 45 व 48वे मि.) तीन गोल केले, तर सलमान शेखने (9 व 47वे मि.) दोन गोल केले. इतर लढतींत अमनोरा स्कूलने मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलवर 2-1ने विजय मिळवला. अमनोराकडून राकेश के. (50वे मि.) आणि आरंभ कौल (दुसरे मि.) यांनी गोल केले, तर मातोश्रीकडून रूपेश म्हस्केने (10वे मि.) गोल केला.

सविस्तर निकाल –
बाद फेरी – शालेय मुली – 1) डॉन बॉस्को हायस्कूल – 5 (रिता देसा 5, 12 व 36वे मि., लॅव्हिना मस्कारेन्हास 6वे मि., सानिका तायडे 29वे मि.) वि. वि. मदर टेरेसा स्कूल – 0.
कनिष्ठ मुले – 1) सरदार दस्तूर होशांग बॉईज हायस्कूल – 2 (यश तापसे 15वे मि., घनश्‍याम पटेल 36वे मि.) वि. वि. अग्रसेन हायस्कूल – 0.
2) द बिशप को. एज्युकेशन स्कूल, उंड्री – 4 (आर्यन तांबे 11 व 33वे मि., सिद्धान्त शहा 43वे मि., हर्ष पाटवा 49वे मि.) वि. वि. सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूल – 1 (अहन जुंगहवान 11 मि.).
3) अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल – 5 (सलमान शेख 9 व 47वे मि., अर्शद खान 43, 45 व 48वे मि.) वि. वि. समता बालक मंदिर स्कूल – 0.
4) अमनोरा स्कूल – 2 (आरंभ कौल दुसरे मि., राकेश के. 50वे मि.) वि. वि. मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल – 1 (रूपेश म्हस्के 10 मि.).
5) वर्ल्ड स्कूल – 1 (मयूर राजा गोधवानी 28वे मि.) वि. वि. मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, निगडी – 0.
6) जय हिंद स्कूल अँड ज्युनियर कॉलेज – 1 (6) (हिमांशू कुंदनानी; प्रवीण वाघ, आर्यन स्वामी, अनिकेत यौद, हिमांशू कुंदनानी, आदित्य माने, वैभव शिंदे) वि. वि. विद्याभवन हायस्कूल – 1 (5) (आयुष पुनमिया; श्रेयस लोहार, आदित्य सुतार, धीरज रांका, झैद मुल्ला, आयुष पुनमिया).
पीसीएमसी मैदान – वरिष्ठ मुले – 1) एसएनबीपी, मोरवाडी – 0 (4) (ऋषिकेश बनसोड, राज थापा, साहिल माने, अनिरुद्ध तानपुरे) वि. वि. मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज – 0 (3) (पीयूष कुलकर्णी, अथर्व म्हेत्रे, साहिल मोरे).
2) कमलनयन बजाज हायस्कूल – 5 (ओंकार बंकर 20, 38 मि., जस्टिन डायस 31 मि., ख्रिस डीसिल्वा 43 मि., गिरीश घाडगे 48 मि.) वि. वि. एसएनबीपी, चिखली – 0

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)