रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फूटबॉल स्पर्धा : पीसीसीओईचा दणदणीत विजय 

पुणे: पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने (पीसीसीओई) संघाने डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी संघावर 10-0 असा मोठा विजय मिळवताना रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील कॉलेज बॉइज गटात विजयी आगेकूच नोंदवली आहे.

पीसीएमसीच्या हेडगेवार मैदानावर झालेल्या या लढतीत पीसीसीओई आणि डी. वाय. पाटील यांच्यातील लढत एकतर्फी झाली. पीसीसीओईकडून मुकुल घारेने (2, 38. 43 मि.) तीन गोल नोंदविले, तर आदर्श वानखेडेने (8,10 मि.) दोन गोल केले. अमेय तळेगावकर (7 मि.), शुभम नेसर्गी (9 मि.), हेमल गोखले (14 मि.), रिशी सपकाळ (35 मि.) आणि आशिष खडसरे (41 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. इतर लढतींत पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगने पीसीसीओई, रावेतचा 1-0ने पराभव केला. आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने मॉडर्न कॉलेजवर 5-0ने मात केली. केईएस प्रतिभा कॉलेजने एस. बी. पाटील कॉलेजवर टायब्रेकमध्ये 4-2ने विजय मिळवला.

-Ads-

सविस्तर निकाल : 
महाविद्यालयीन मुले – डी. वाय. पाटील एचएमसीटी – 5 (वैष्णव कदम 3 मि., जेसन निकोल्स 14, 16 मि., लुकास फ्रान्सिस 18, 19 मि.) वि. वि. प्रो. रामकृष्ण मोरे एसीएस कॉलेज – 3 (अनुपम अल्हाट 4 मि., रोहन सरडे 44 मि., अविनाश 48 मि.), डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, पिंपरी – 1 (पियूष मांजरेकर 8 मि.) वि. वि. पीसीसीओइ, रावेत – 0. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी – 5 (सुबोध फडे 6, 12 मि., अनुप कोंबे 24 मि., हर्ष तेजवानी 25 मि., रिषभ शुक्‍ला 44 मि.) वि. वि. मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडी – 0. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग – 10 (मुकुल घारे 2, 38, 43 मि.,अमेय तळेगावकर 7 मि, आदर्श वानखेडे 8, 10 मि., शुभम नेसर्गी 9 मि., हेमल गोखले 14 मि., रिशी सपकाळ 35 मि., आशिष खडसरे 41 मि.) वि. वि. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी-0. केईएस प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडिज – 1 (4) (प्रतिक यादव 5 मि., रोहन पाटील, जतिन पलांडे, आयूष वामन, गौरव परदेशी) वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स – 1 (2) (रुचित एम. 37 मि., फरहान, रिहान मन्यार).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)