रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल: ब्लू रिद्‌ज, जयहिंद, इंदिरा कॉलेजचे संघर्षपूर्ण विजय 

पुणे: ब्लू रिद्‌ज पब्लिक स्कूल, जयहिंद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्सया संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.
पीसीएमसीच्या हेडगेवार मैदानावर झालेल्या या लढतीं मधिल पहिल्या लढतीत ज्युनियर मुलांच्या गटात ब्लू रिद्‌ज संघाने अल्फोन्सा हायस्कूलवर 2-1ने मात केली. यात शिशिर भुजबळेने 28व्या मिनिटाला गोल करून ब्लू रिद्‌ज संघाला आघाडी मिळवून दिली होती मात्र यानंतर अखिलेश महराने 33व्या मिनिटाला गोल करून अल्फोन्साला बरोबरी साधून दिली. तर, 45व्या मिनिटाला दीपक शानभागने गोल करून ब्लू रिद्‌जला विजय मिळवून दिला.
यानंतर अमरिता विद्यालयमने पीईएसएस मॉडर्न हायस्कूलवर 2-0 असा एकतर्फी विजय मिलवला. यात पौरस परबने (1 आणि 24 मि.) असे दोन गोल करत सामन्यात वर्चस्व गाजवले. तर, सीनियर मुलांच्या गटात जयहिंद हायस्कूलने गीतामाता संघावर 1-0 ने मात केली, तर कॉलेज बॉईज गटात हिंदुस्तान एरोस्पेस कॉलेज आणि इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्सने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
निकाल – ज्युनियर मुले – ब्लू रिद्‌ज पब्लिक स्कूल – 2 (शिशिर भुजबळ 28 मि., दीपक शानभाग 45 मि.) वि. वि. अल्फोन्सा हायस्कूल – 1 (अखिलेश महरा 33 मि.), अमरिता विद्यालयम अँड ज्युनियर कॉलेज – 2 (पौरस परब 1, 24 मि.) वि. वि. पीईएसएस मॉडर्न हायस्कूल इंग्लिश मीडियम – 0.
सीनियर मुले – जयहिंद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज – 1 (गणेश पाटील 4 मि.) वि. वि. गीतामाता आर्टस सायन्स अँड कॉमर्स – 0.
कॉलेज बॉईज – हिंदुस्तान एरोस्पेस अँड इंजिनीअरिंग कॉलेज – 3 (अयान सय्यद 41 मि., प्रकाश सिंग 43, 46 मि.) वि. वि. मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी -0, इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स – 2 (भुवन पिल्ले 3 मि., शुभम पोतघन 37 मि.) वि. वि. केईएस प्रतिभा कॉलेज ऑफ कम्प्युटर स्टडिज – 1 (वरुण ठक्कर 39 मि.).
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)