रिलायन्स फाउंडेशन यूथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे संमिश्र यश

पुणे: डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या वेगवेगळ्या संघांसाठी रिलायन्स फाउंडेशन यूथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील आजचा दिवस संमिश्र यशाचा ठरला. पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील एसीएस संघाने मंघनमल उधराम कॉलेज ऑफ कॉमर्स संघावर विजय मिळवला. परंतु त्यांच्या इतर संघांना पराभवाचा सामना करावा लागला.

 

-Ads-

पीसीएमसीच्या हेडगेवार मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील महाविद्यालयीन मुलांच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील संघाने मंघनमल उधराम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग संघावर 1-0 ने मात केली. यात ऋतुराज साळुंखेने (48 मि.) केलेला गोल महत्त्वाचा ठरला. मात्र डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग संघाला इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट संघाविरुद्ध 0-1 असा पराभव पत्करावा लागला. सुशांत शिवलकरने 48 मिनिटाला निर्णायक गोल केला. तिसऱ्या सामन्यात सीएमएस इंग्लिश मीडियम हायर सेकंडरी स्कूल संघाला जे. प्रबोधिनी नवानगर विद्यालय संघाविरुद्ध 1-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

 

मयुरेश फरांदेने 10व्या व 26व्या मिनिटाला गोल करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पियूष सावंतने 44व्या मिनिटाला गोल करीत त्याला सुरेख साथ दिली. सीएमएस इंग्लिश मीडियम हायर सेकंडरी स्कूल संघाकडून अनिरुद्ध नायरने 39व्या मिनिटाला एकमेव गोल केला. आणखी एका सामन्यात बाबूरावजी घोलप कॉलेज संघाने डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग संघाचा 3-0 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. शुभम सावंतने 14 व 30व्या मिनिटाला, तर प्रतीक पाटीलने 46व्य मिनिटाला गोल करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

सविस्तर निकाल – महाविद्यालयीन मुले- 1) एएसएम सीएसआयटी – 1 (गणेश वाघमारे 19 मि.) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्‍नॉलॉजी अँड बायोइन्फोर्मटिक्‍स इन्स्टिट्यूट – 0, 2) जे. प्रबोधिनी नवानगर विद्यालय – 3 (मयुरेश फरांदे 10, 26 मि., पियूष सावंत 44 मि.) वि. वि. सीएमएस इंग्लिश मीडियम हायर सेकंडरी स्कूल – 1 (अनिरुद्ध नायर 39 मि.), 3) इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट – 1 (सुशांत शिवलकर 48 मि.) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग – 0, 4) डॉ. डी. वाय. पाटील एसीएस, पिंपरी – 1 (ऋतुराज साळुंके 48 मि.) वि. वि. मंघनमल उधराम कॉलेज ऑफ कॉमर्स – 0, 5) बाबूरावजी घोलप कॉलेज – 3 (शुभम सावंत 14, 30 मि., प्रतीक पाटील 46 मि.) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-0.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)