रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: कमलनयन बजाज हायस्कूल बाद फेरीत दाखल

पुणे: कमलनयन बजाज हायस्कूलने ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलवर विजय मिळवून रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील सीनियर मुलांच्या गटातून बाद फेरीत प्रवेश केला.

पिंपरी-चिंचवड येथील हेडगेवार ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील सीनियर मुलांच्या गटातील लढतीत कमलनयन बजाज हायस्कूल संघाने ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलवर 3-1ने मात केली. यात बजाज हायस्कूलकडून चैतन्य फाळके (12 मि.), सॅम्युएल गोम्स (17 मि.) आणि अलन रॉय (42 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ग्लोबल स्कूलकडून निखिल मड्डिपाटलाने (46 मि.) गोल केला. या विजयासह बजाज हायस्कूलचा संघ जी गटात अव्वल स्थानावर राहिला आणि उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्युनियर मुलांच्या गटात जीजी इंटरनॅशनल स्कूलने पोद्दार इंटरनॅशनल स्कूलवर 10-0 असा दणदणीत विजय मिळवला. यात अच्युत अभयने (3, 4, 40 मि.) तीन गोल केले, आदित्य भोसलेने (32, 42 मि.) दोन आणि ब्रिजेश पटेल (8 मि.), अद्वैत पोटे (12 मि.), ऋग्वेद भोसले (38 मि.), अभय दिवटे (45 मि.) देवेश गरुड (46 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

सविस्तर निकाल –
कनिष्ठ मुले : लीग ग्रुप जी – कमलनयन बजाज हायस्कूल 3 (चैतन्य फाळके 12 मि., सॅम्युएल गोम्स 17 मि., अलन रॉय 42 मि.) वि. वि. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल 1 (निखिल मड्डिपाटला 46 मि.), केईएस प्रतीभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॅम्प्युटर स्टडी 3 (गौरव परदेशी 7 मि., जतीन पलांडे 12, 24 मि.) वि. वि. जय हिंद स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 1 (सिद्धेश भोर 43 मि.),
कनिष्ठ मुले : पहिली फेरी – जीजी इंटरनॅशनल स्कूल 10 (अच्युत अभय 3, 4, 40 मि., ब्रिजेश पटेल 8 मि., अद्वैत पोटे 12 मि., आदित्य भोसले 32, 42 मि., ऋग्वेद भोसले 38 मि., अभय दिवटे 45 मि., देवेश गरुड 46 मि.) वि. वि. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 0,
तिसरी फेरी : सिटी प्राईड स्कूल 3 (आदित्य जगताप 7, 12 मि., मिहीर स्वामी 35 मि.) वि. वि. न्यू मिलेनियम स्कूल 1 (सार्थक महाडिक 43 मि.).
महाविद्यालयीन मुले : लीग ग्रुप एच – राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग 1 (दिलखुश सिंग 36 मि.) वि. वि. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग 0. ग्रुप जी डी. वाय. पाटील एसीएस, पिंपरी 0 बरोबरी वि. एएसएम सीएसआयटी 0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)