रिलायन्स ग्रुपकडून केरळला मदतीचा हात

मुंबई – महापुराने थैमान घातलेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनही केरळला मदत पाठवली जात आहे. देशातील बडे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय रिलायन्स फाऊंडेशन तब्बल 51 कोटी रुपयांचे जिवनावश्‍यक साहित्य पाठवणार आहे.

रिलायन्सने देऊ केलेली ही मदत अनेक राज्यांनी दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राबाबतच सांगायचे झाल्यास फडणवीस सरकारने केरळसाठी 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्राची ही मदत अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. आता रिलायन्सने त्यापेक्षा जास्तची आर्थिक मदत केली आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी केरळमधील जनतेप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. “केरळचे नागरिक कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन आवश्‍यक ती सर्वतोपरी मदत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची मदत देत आहोत, असे नीता अंबानी यांनी सांगितले. तसेच रिलायन्स फाऊंडेशनने केरळमध्ये नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांसाठी पुनर्वसन केंद्र, शाळा, रुग्णालयांची डागडुजी करण्याची घोषणाही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)