रिमेक, सिक्‍वेल आणि बायोपिकने गाजवलेले वर्ष

2018 हे वर्ष बॉलीवूडमध्ये आलेल्या रिमेक आणि सिक्‍वेलमुळे गाजले होते. या वर्षभरात हिचकी, बागी 2 आणि धडक हे सिनेमे गाजलेल्या सिनेमांचे रिमेक होते. तर हेट स्टोरी- 4, रेस-3, साहेब बिबी और गॅंगस्टर, हॅपी फिर भाग जायेगी, नमस्ते इंग्लंड आणि 2.0 हे सिक्‍वेल होते. याशिवाय बायोपिक सिनेमेही बॉक्‍स ऑफिसवर खूप गाजले.

राणी मुखर्जीचा कमबॅक सिनेमा हिचकी हा हॉलिवूडच्या फ्रंट ऑफ क्‍लास वर आधारीत आहे. “टॉरेट सिंड्रोम’ने ग्रस्त असलेल्या एका शिक्षिकेचा रोल राणीने यात केला होता. कमी बजेटमध्येही हिचकीने 47 कोटींचा धंदा केला. त्यानंतर आलेला बागी-2 हा सिक्‍वेल आणि रिमेकही होता. तेलगू फिल्म क्षणमचा हा हिंदी रिमेक होता. टायगर श्रॉफच्या अॅक्‍शनमुळे हा कमालीचा हिट झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठीत सुपरहिट ठरलेल्या सैराटचा रिमेक असलेल्या धडकमधून श्रीदेवीची कन्या जान्हवी आणि इशान खट्टरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यातील गाणी आणि लव्हस्टोरीमुळे प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनिल कपूर, ऐश्‍वर्या राय आणि राजकुमार रावच्या फन्ने खान हा इंग्लिश फिल्म एव्हरीबडी इज फेमसचा हिंदी रिमेक होता. या मूळ इंग्लिश सिनेमाचे ऑस्कर नॉमिनेशन झाले होते. त्यातुलनेत फन्ने खानला जेमतेम प्रतिसाद मिळाला. उद्या रिलीज होणारा सिंबा हा देखील तेलगू हिट टेंपरचा हिंदी रिमेक आहे.

सिक्‍वेलमध्ये हेट स्टोरी- 4 हा या फ्रॅंचाईजीचा चौथा सिनेमा होता. उर्वशी रौतेलाचा लीड रोल असलेल्या या सिनेमाला जेमतेमच प्रतिसाद मिळाला. सलमान खानचा रेस-3 सर्वात बहुप्रतिक्षित सिक्‍वेल होता. जॅकलीन फर्नांडिस आणि सलमानची जोडी असलेल्या या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे बॉक्‍स ऑफिसवर यश नाही मिळाले. त्याच प्रमाणे साहेब, बिबी और गॅंगस्टर 3 हा संजय दत्त, जिमी शेरगिल आणि चित्रांगदा सिंहचा सिक्‍वेल आणि हॅपी भाग जायेगीचा सिक्‍वेल हॅपी फिर भाग जायेगी हा सिक्वेलही अपयशीच ठरला. रोबोटचा सिक्‍वेल असलेल्या रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 ची सर्वात जास्त चर्चा झाली. भारतातील सर्वात महागडा सिनेमा ठरलेल्या 2.0 ला आतापर्यंत तरी चांगला प्रतिसाद आहे.

बायोपिकच्या बाबतीत बोलायचे तर अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि संजू या दोन्ही मोठ्या सिनेमांनी बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कमाई केली. त्याशिवाय हॉकीपटू संदीप सिंहवर आधारीत सूरमा आणि नंदिता दास दिग्दर्शित मंटो या सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर जेमतेम यश मिळाले असले तरी विश्‍लेषकांनी त्याचे कौतुकच केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)