रिमा खानची भारतीय सिनेमावर टीका

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांना भारतीय निर्मात्यांनी आपल्या सिनेमांमध्ये घेऊ नये यासाठी आंदोलन झाले होते. त्यानुसार पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागावर बंदीही घालण्यात आली होती. पाकितानी ऍक्‍ट्रेस माहिरा खानने याबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. तिने भारतातल्या सिनेमामध्ये काम केल्यामुळे तिच्या “रईस’वर पाकिस्तानात बंदीही घातली गेली होती. बॉलिवूडमध्ये आपली डाळ शिजणार नाही, हे लक्षात आल्यावर कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशा थाटात “बॉलिवूड हे कधीच माझे लक्ष्य नव्हते.’ असे ती म्हणाली होती.

आता आणखी एका पाकिस्तानी ऍक्‍ट्रेसने बॉलिवूडबाबत मुक्‍ताफळे उधळली आहेत. बॉलिवूडची स्वतःची काही ओळखच नाही, असे या रिमा खानने म्हटले आहे. तिला एका इंटरव्ह्यूमध्ये जेंव्हा भारतातल्या सिनेमामध्ये काम करण्याबाबत प्रश्‍न विचारला गेला होता, तेंव्हा तिने आपली मते मांडली. बॉलिवूडमध्ये काम करण्यास आपण यापूर्वीच नकार दिला असल्याचे तिने सांगितले. म्हणजे तिला बॉलिवूडमध्ये कामाची संधी मिळाली होती. पण तिने त्याला नकार दिला आहे. काही बड्या निर्मात्यांनी तिला आपल्या सिनेमामध्ये घेण्याची तयारी दर्शवली होती. सिनेक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करण्याची एक चांगली संधी तिच्यासाठी चालून आली होती. तिने जर भारतीय सिनेमामध्ये काम केले असते, तर तिच्या करिअरला कलाटणीच मिळाली असती. पण तिने या ऑफरला नकार दिला होता.

रिमाला 2000 च्या दशकामध्ये काही पंजाबी सिनेमांची ऑफर आली होती. मात्र या सिनेमांची स्क्रीप्ट अगदी थर्डक्‍लास असल्याचे कारण सांगून तिने नकार दिला होता. याच्या आधारेच तिने भारतीय सिनेमाची ओळख नसल्याचा काल्पनिक शोध लावला. भारतात जे सिनेमे बनतात, ते हॉलिवूडची कॉपी असते. भारतात बॉलिवूडमध्ये ब्लॅक मनीचा वापर होत असतो, म्हणून बरे चालले आहे. पाकिस्तानमध्ये असे होत नाही, असे म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. रिमा खानने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. तिची सिरीज “रिमा खान्स’ला अमेरिकेत “एएएम 2014’चे पार्टनर ऍवॉर्डही मिळाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)