रिमझिम पावसात भाविकांनी घेतले सोमश्‍वराचे दर्शन

करंजे- राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवभक्तांनी बारामती तालुक्‍यात नीरा-बारामती राज्य महामार्गावर करंजेपूलपासून चार कि. मी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी केली होती. सौराष्ट्रातील प्रतिसोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दरवर्षी श्रावणात महिनाभर यात्रा भरते.
आज (दि. 20) श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रविवारी (दि. 19) मध्यरात्री 12 वाजता बारामती तालुक्‍याचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.
सोमवारी सकाळी 10 वाजता वडगाव निंबाळकर (ता. बारामती) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी पत्नीसह पुरोहित ऋषीकेश घोलप, पुजारी प्रताप भांडवलकर यांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी संजय स्वामी, मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एसटी महामंडळाद्वारे भाविकांसाठी अधिक गाड्यांची सोय करण्यात आली होती. याबरोबरच संस्थानतर्फे भाविकांसाठी भक्त निवास, प्रशस्त वाहनतळ, पिण्यासाठी पाणी आदी सुविधा करण्यात आल्या होत्या. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौदा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी वडगाव निंबाळकर सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे आणि उपनिरीक्षक जी. टी. संगपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)