‘रिफायनान्स’ने मिळवा फायदा (भाग-१)

गृहकर्ज वेळेआधीच फेडल्यास त्यावर कोणत्याही प्रकारची पेनल्टी आकारली जात नाही. जर आपल्या कर्जाला रिफायनान्सिंग करायचे असेल तर त्यावर केवळ प्रक्रिया शुल्क आकारले जाते. अशा स्थितीत जर प्रोसेसिंग फी पासून सवलत मिळत असेल तर आपण जुन्या कर्जाला अशा बॅंकेत ट्रान्सफर करून मोठ्या प्रमाणात बचत करू शकता. सध्याच्या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत असतील तर अशा बॅंकांतून कर्जाला रिफायन्सिंग करण्याचा विचार करावा.

‘रिफायनान्स’ने मिळवा फायदा (भाग-२)

सणासुदीच्या काळात बॅंका वातावरणाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक ऑफरचा मारा करतात. उत्सवाच्या काळातच कर्जाचे सर्वाधिक वाटप होत असल्याचे सर्व्हेक्षणातून आढळून आले आहे. यादरम्यान इंटरनेटपासून वर्तमानपत्र, एसएमएस, जाहिराती आदींच्या माध्यमातून ग्राहकांना ऑफरची माहिती दिली जाते. यामध्ये सर्वात सामान्य आढळून येणारी बाब म्हणजे झिरो प्रोसेसिंग फी. ही ऑफर नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांना किंवा आपल्या जुन्या गृहकर्जाला अन्य बॅंकेत ट्रान्सफर करून त्याला रिफायनान्स करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. अर्थात गृहकर्ज वेळेआधीच फेडण्यावर म्हणजेच प्रीपेमेंटवर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. रिफायन्सिंगवर केवळ प्रक्रिया शुल्क आकारले जाते. मात्र, अशा स्थितीत प्रोसेसिंग शुल्कावर सवलत मिळत असेल तर आपल्या जुन्या कर्जाला अधिक सवलत देणाऱ्या बॅंकेत ट्रान्सफर करणे हिताचे ठरेल. या बदलातून ग्राहकाला मोठा लाभ मिळणे शक्‍य आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात तुलनेने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बॅंकांची कर्जासाठी निवड करणे आर्थिक फायद्याचे ठरते.

– विधिषा देशपांडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)