‘रिफायनान्स’ने मिळवा फायदा (भाग-२)

‘रिफायनान्स’ने मिळवा फायदा (भाग-१)

ग्राहक आपल्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारावर नवीन बॅंकांबरोबर वाटाघाटी करू शकतो आणि कमीत कमी व्याजदराच्या आधारावर कर्ज पदरात पाडून घेऊ शकतो. ग्राहक बॅंकेकडून कर्ज ट्रान्सफरच्या बदल्यात अनेक प्रकारच्या सवलती घेऊ शकतो. ग्राहकांना आपल्यासाठी उपयुक्त बॅंकेची निवड ही पुढील दोन निकषाच्या आधारे करावयास हरकत नाही.
व्याजदर: गृहकर्जाचा व्याजदर हा कर्जातील अत्यत महत्त्वाचा घटक. व्याजदर आकारणीवरून कर्जाचा कालावधी कमी जास्त होत असतो. गेल्या काही महिन्यांपासून व्याजदर कमी असल्याने ग्राहकांना चांगला फायदा होत होता, आता पुन्हा व्याजदर नऊ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होऊ लागल्याने ग्राहकांना कमी व्याजात रिफायनान्स करणाऱ्या बॅंकांचा विचार करण्याची संधी मिळाली आहे. किमान 0.5 टक्‍क्‍यापेक्षा कमी असले तरी कर्जाच्या संपूर्ण कालावधीत मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. उदा. एखाद्या व्यक्तीने 25 लाखांचे गृहकर्ज घेतले असेल तर या आधारावर व्याजदरात मिळालेली सवलत ही दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. एकूणात ग्राहकाची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. म्हणूनच ग्राहकांनी वर्तमान बॅंकेवरच सध्याच्या काळाप्रमाणेच व्याजदर आकारण्याबाबत आग्रह धरावा. जर बॅंकेने व्याजदर कमी करण्यास नकार दिला तर अशावेळी अन्य बॅंकेकडून रिफायनान्स करावे आणि कमी व्याजदराच्या आधारावर गृहकर्ज पदरात पाडून घ्यावे.
टॉप अप कर्जाची गरज

घराच्या अंतर्गत सजावटीसाठी किंवा फर्निंचरसाठी गृहकर्जाच्या व्याजदरावर अनेक बॅंका टॉप अप कर्ज देत आहेत. सर्वसाधारण परिस्थितीत आपल्या घराची डागडुजी किंवा रिनोव्हेशन करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला या कामासाठी पर्सनल कर्ज घ्यावे लागते. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित असते आणि त्याचा व्याजदरही अधिक असतो. अशा स्थितीत टॉप अप कर्ज हे बऱ्यापैकी फायदेशीर ठरू शकते. या माध्यमातून आपण बऱ्यापैकी पैशात बचत करू शकतो. अर्थात बॅंकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध प्रस्तांवावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि आपल्या गरजेनुसार ऑफरची संधी हातातून जाऊ न देणे महत्त्वाचे ठरते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, फ्री गिफ्ट किंवा सोन्याचे नाणे यासारख्या ऑफरला बळी पडून कोणत्याही प्रकारचे महागडे कर्ज निर्णय घेऊ नये. आपण थेट सवलत मागण्याबाबत ठाम किंवा आग्रही असावे.

– विधिषा देशपांडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)