सातारा: रिपाइं अधिवेशनाला हजारो कार्यकर्ते जाणार : अशोक गायकवाड

सातारा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने आयोजित राज्यव्यापी अधिवेशन रविवारी दि.27 मे रोजी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातूनही दोन हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष ना.रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना उर्जा मिळणार आहे. इंधन दरवाढीबाबत ना. आठवले पंतप्रधानांशी बोलणार आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी रिपाइं आंदोलन करतच राहणार आहे, असे सांगून गायकवाड म्हणाले, अधिवेशनानंतर जिल्हा व तालुका कार्यकारणी तसेच युथ संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार आहेत. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना पदावरून काढण्यात येणार असून त्यांच्या जागी सक्रिय कार्यकर्त्यांनी संधी देण्यात येणार आहे, असे ही गायकवाड यांनी सांगितले. त्यावेळी शरद गायकवाड, अप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे, सचिन वायदंडे, फारूक पटनी, आयेशी पटनी आदी उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)