रिपाइंच्या खेड तालुकाध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

चाकण-चाकण येथे झालेल्या मराठा आंदोलनानंतर घडवून आणलेल्या दंगलीबाबत आवाज उठवण्याऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस यांना काही समाजकंटकांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे.
चाकण येथे 30 जुलै 2018 रोजी मराठा समाजाने आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण देत येथे दंगल घडवून आणली. या दंगलीबाबत संतोषनाना डोळस यांनी वेळोवेळी आवाज उठविला. याविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक लोकप्रतिधी, प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठांसह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने दिली. याचा राग मनात ठेवून या दंगलीच्या संशयित सूत्रधारांनी काही समाजकंटकांना हाताशी धरून धमकाविण्याचे प्रकार सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संतोषनाना डोळस यांना वेगवेगळ्या लोकांनी धमक्‍या दिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे डोळस हे रिपाइंचे तालुकाध्यक्ष असताना ते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाही मदत करतात याचाही राग मनात ठेवत त्यांच्या पार्टीतील काहींनी त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या त्यांना शिवीगाळ केली जात आहे, तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली जात आहे. या कारणास्तव संतोषनाना डोळस यांनी चाकण पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे.

  • चुकीच्या निर्णयाविरोधात जाहिर बंड करणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे होय. त्यामुळे चाकण दंगलीबाबत मी आवाज उठविला. यानंतर मला धमकी देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मी याची रीतसर तक्रार चाकण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तरीदेखील मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. पोलिसांनी याची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. माझ्या जीवाला धोका असल्याने याची जबाबादारी पोलीस प्रशासनाची आहे. माझा गृह विभागावर पूर्णपणे विश्‍वास आहे.
    -संतोषनाना डोळस, अध्यक्ष रिपाइं खेड तालुका
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)