#video : रितेश देशमुखच्या ‘माऊली’चा टिझर प्रदर्शित 

लय भारीच्या प्रचंड यशानंतर रितेश देशमुख पुन्हा एकदा माऊलीच्या रूपाने प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज झाला आहे. ‘माऊली’ चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टिझर शाहरुख खानने ट्विटर अकाऊंवरून शेअर केला आहे. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त आणि ऍक्शन आणि संवाद ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे.

माऊली या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे तर निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. या चित्रपटाला अजय-अतुलच्या संगीताची साथ  मिळाली आहे.  रितेशसोबत बॉलिवूडमधील एक अभिनेत्री मराठीत पदार्पण करत आहे. ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)