रिटेल सेक्‍टर: रोजगाराच्या विपुल संधी

स्वाती देसाई

रोजगाराच्या दृष्टिकोनातून रिटेल सेक्‍टर सर्वोत्तम क्षेत्रापैकी एक मानले जाते. हे सेक्‍टर लंबी रेस का घोडा मानले जाते. विविध कौशल्य अवगत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इथे रोजगाराची संधी आहे. स्टॅटिस्टिक्‍स, इंजिनिअरिंग, फॅशन डिझाईनिंगचे कौशल्य अवगत असलेल्या मंडळींना देखील रिटेलमध्ये करिअर करता येऊ शकते. त्याचवेळी कमी शिकलेल्या लोकांसाठी देखील रिटेल सेक्‍टर उपयुक्त ठरताना दिसून येते. मोठमोठे शोरूम, मॉल्समध्ये खरेदी करणे हा आजकालच्या ग्राहकांचा लोकप्रिय ट्रेंड आहे. कारण सर्वप्रकारच्या वस्तू एकाच छत्रछायेखाली मिळत असल्याने ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी भटकंती करायची गरज पडत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य अशा गोष्टी एकाच ठिकाणी ग्राहकांना मिळत आहेत. दुसरे म्हणजे ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. स्वत:च ती वस्तू पारखून त्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य मॉलमध्ये असते. भारतीय ग्राहकांच्या खर्चाची क्षमता वाढल्याने आणि नामवंत ब्रॅंडच्या वस्तू खरेदीचा ट्रेंड पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या रिटेल बाजारात गुंतवणूक करत आहेत.

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) ने आपल्या व्हिजन 2020 अहवालात भारतीय रिटेल इंडस्ट्रीचा बाजार 2020 पर्यंत 50 टक्‍क्‍यांनी वाढून तो 650 अब्ज डॉलरहून एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे. सिंगल ब्रॅंड रिटेलमध्ये शंभर टक्के थेट एफडीआयच्या मंजुरीनंतर नवनवीन स्टोअर सुरू होण्याच्या शक्‍यतेने येत्या तीन वर्षांत रोजगाराचे प्रमाण वाढेल, असे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संधींची शक्‍यता – टाटा, रिलायन्स, आदित्य बिर्ला यांसारख्या मोठमोठ्या मल्टी रिटेल साखळी उद्योग समूहांनी या सेक्‍टरमध्ये युवकांसाठी सतत रोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. रिटेल मॅनेजमेंटशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण स्टोअर मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, मर्कंटाइझ ऑफिसर, कस्टमर केअर एक्‍झिक्‍यूटिव्ह, फ्लोर मॅनेजर, सेल्स मॅनेजर आणि सेल्स एक्‍झिकेटिव्ह म्हणून करिअर सुरू करू शकता. याशिवाय प्रत्येक लहान-मोठ्या शहरात सुरू होत असलेल्या मेगा मॉल फॅमिली मार्ट, बिग बाझार, ब्रॅंडेड स्टोअर, ब्रायडल वेअर स्टोअर, डिझायनर स्टोअर सारख्या विविध रिटेल आऊटलेटस्‌वर आपण नोकरीची संधी शोधू शकतो. फॅशन आणि रिटेल मॅनेजमेंटच्या करणाऱ्यांसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, अमेझॉन, ऍम्पी आणि शॉपर्सटॉपसारख्या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांतही रोजगाराच्या विपूल संधी आहेत. याशिवाय आपण स्वत:चे आऊटलेटही सुरू करू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेक्‍टरमध्ये स्किल्ड आणि नॉनस्किल्ड या दोन्ही प्रकारच्या युवकांसाठी पार्टटाइम आणि पूर्णवेळ नोकरीची संधी उपलब्ध आहे.

कामाची विभागणी – रिटेल उद्योगाचे कामकाज दोन भागात स्टोअर आणि ऑपरेशन गुडस्‌ सप्लायमध्ये विभागलेले असते. त्यास सेल्स आणि बॅकएंड असेही म्हटले जाते. स्टोअर ऑपरेशनतंर्गत अशी मंडळी येतात की, ते शोरूममध्ये कस्टमरच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभे राहून स्टोअर सांभाळात असतात. तर गुडस्‌ सप्लाय सेक्‍शनमध्ये कंपनीच्या आऊटलेटसाठी सामानाची खरेदी आणि पुरवठा करण्याचे काम पाहात असतात. यासाठी विविध जॉब्स प्रोफाईलचे लोक याठिकाणी आपली सेवा देत असतात.

कस्टमर सेल्स असोसिएट – रिटेल फिल्डचा हा एंट्री लेव्हल जॉब आहे. मात्र या पदाला महत्त्व आहे. कारण कोणताही रिटेल शॉप हा पायाभूत रचनेवरच अवलंबून असतो. अशा स्थितीत कस्टमर डिलिंग चांगल्या रितीने करण्याची क्षमता या व्यक्तीकडे असते. प्रॉडक्‍टची संपूर्ण माहिती या पदावरील व्यक्तीकडे असते.
स्टोअर मॅनेजर – अशा प्रकारचे प्रोफेशनल जनरल मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजरच्या रूपातून ओळखले जातात. स्टोअरच्या कामकाजावरील देखरेख, त्यांना सांभाळण्याशिवाय कर्मचाऱ्यांची ड्युटी लावणे, वेळापत्रक तयार करणे, पुरेसे मनुष्यबळाची व्यवस्था राखणे याप्रकारची जबाबदारी स्टोअर मॅनेजरवर असते. अशा पदावर असणारे लोक हे डिस्ट्रीट किंवा एरिया मॅनेजरला अहवाल सादर करत असतात.

रिटेल ऑपरेशन मॅनेजर – रिटेल मॅनेजर हे सर्वसाधारणपणे नियोजनाशी निगडित काम करत असतात आणि आउटलेटच्या संचालनमध्ये सहकार्य देतात. त्याचबरोबर मर्कंटाईंज, ऑर्डर आणि स्टाफवर देखरेख तसेच पुरवठा व्यवस्था देखील पाहण्याची जबाबदारी रिटेल ऑपरेशन मॅनेजरवर असते.

रिटेल बायर्स मर्कंटायजर – रिटेल शॉप्ससाठी सामानाची खरेदी याठिकाणी नागरिक करत असतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून रिटेल बायर्स मर्कंटायजर हे महत्त्वाचे पद आहे. कारण अशा मंडळींना ग्राहकांची गरज पाहवी लागते आणि आवड-निवडीकडे लक्ष द्यावे लागते. बाजारातील ट्रेंड राखण्याचे काम देखील या मंडळींकडे असते.

व्हिज्युअल मर्कंटायजर – कोणत्याही उत्पादनाचे प्लॅनिंग आणि डिझाइनमध्ये व्हिज्युअल मर्कंटायझरची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अशा प्रकारचे काम सर्वसाधारणपणे टेक्‍निकल डिझायनर प्रोफेशनल करतात.

अन्य जॉब्स – रिटेल सेक्‍टरमध्ये कंपनीच्या व्यवसायाच्या हिशोबाने याठिकाणी विश्‍लेषक, सप्लाय चेन डिस्ट्रीब्युटर, मार्केटिंग एक्‍झिकेटिव्ह, वेअरहाऊस मॅनेजर, रिटेल कम्युनिकेशन मॅनेजर, ब्रॅंड मॅनेजर, कस्टमर केअर एक्‍झिकेटिव्हसारख्या अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

पात्रता आणि अभ्यासक्रम – रिटेल सेक्‍टरमध्ये येण्यासाठी आपल्याला रिटेल मॅनेजमेंटमध्ये एमबीए, रिटेलमध्ये सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स करावा लागेल. याशिवाय बीबीए इन रिटेलिंग, पीजी इन रिटेल अँड मार्केटिंग, पीजी डिप्लोमा इन व्हिज्युअल मर्कंटाईंज अँड स्टोअर डिझाइनसारखे अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्ससाठी कोणत्याही स्ट्रिममध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक 12 वी पास होणे आवश्‍यक आहे. सहा महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंतच्या कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. त्याचवेळी रिटेलमध्ये पीजी डिप्लोमा किंवा मास्टर डिग्री प्रोग्रॅम करण्यासाठी कोणत्याही संस्थेतून पदवी मिळवणे गरजेचे आहे. काही संस्थांत बीएससी/एमएससी इन फॅशन मर्केडायनिंग अँड रिटेल मॅनेजमेंट बॅचलर ऑफ फॅशन रिटेल मॅनेजमेंटसारखी पदवी अभ्यासक्रम देखील सुरू आहेत. सर्वसाधारणपणे या अभ्यासक्रमातंर्गत युवकांना मार्केटिंग स्ट्रॅटजी, अकाऊटिंग, फायनान्स मॅनेजमेंट, कस्टमर रिलेशन्स, व्हिज्युअल मर्केटाईंज, मॉल मॅनेजमेंट, ब्रॅंड मॅनेजमेंट, सेल्स मॅनेजमेंट, स्टोअर ऑपरेशन, रिटेल कम्युनिकेशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटसंबधी विषयाची माहिती दिली जाते.

प्रमुख संस्था – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, अन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी, कोइम्बतूर, तमिळनाडू, लक्‍झरी कनेक्‍ट बिझनेस स्कूल, एलसीबीएस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)