रिटेल क्षेत्रासाठी लवकरच राष्ट्रीय धोरण

 कृतीदल स्थापन होणार; राज्यांशीही विचारविनिमय केला जाणार

नवी दिल्ली – देशात 6.7 कोटी इतके किरकोळ विक्रेते आहेत. मॉल आणि ई- कॉमर्समुळे या क्षेत्रात वेगाने बदल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी एक राष्ट्रीय पातळीवर धोरण तयार करण्याच्या हालचाली सुरू आहे.

हे क्षेत्र शिस्तबद्धरीत्या विकसित व्हावे. यात ग्राहकांच्या हिताचा बळी दिला जाऊ नये. यासाठी केंद्र राज्यांनाही विचारात घेऊन हे धोरण तयार करणार आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने तशी सूचना ग्राहक व्यवहार विभागाला दिली आहे. याकरीता कृती दल तयार करण्यात येणार आहे.

या कृती दलात संबधित मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि राज्याचे प्रतिनिधी असण्याची शक्‍यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्राहकांची क्रयशक्ती वेगाने वाढत आहे. रिटेल क्षेत्रात नवे तंत्रज्ञान येत आहे. या सर्वाचा विचार करून नवे धोरण तयार करण्याची गरज असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे.

सध्या ई- कॉमर्स धोरण तयार केले जात आहे. ई कॉमर्स आणि रिटेल क्षेत्राचा जवळचा सबंध आहे. त्यामुळे या दोन्हीत समन्वय असण्याची गरज आहे. त्यामुळे रिटेल धोरणात ई-कॉमर्स धोरणालाही विचारात घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर दुकानाचा परवाना राज्याकडून दिला जातो. त्यामुळे राज्यांनाही यासाठी विचारात घेण्याची गरज असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताला निर्यातही वाढवायची आहे. जर योग्य असे रिटेल धोरण तयार झाले तर त्यामुळे निर्यात वाढण्यासही मदत होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाला वाटते. ग्राहक व्यवहार विभाग या सर्व बाबी ध्यानात घेऊन या विषयावर लवकरच काम सुरू करणार असल्याचे सांगितले जाते.

भारतातील रिटेल उद्योग गेल्या दहा वर्षात वेगाने वाढत आहे. विशेषत मोठ्या शहरात आधुनिक रिटेल उद्योग वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर मोठ्या शहरातून ई-कॉमर्सही वेगाने वाढत आहे. या सर्व बाबींचे नियंत्रण करणारे सर्व समावेशक रिटेल धोरण शक्‍य तितक्‍या लवकर तयार करण्याची गरज आहे. त्या   दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारनाही पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)