रिझर्व्ह बॅंकेकडून सोन्याची खरेदी

व्यापारयुद्ध आणि चलनबाजारातील अस्थिरतेचा परिणाम मध्यम पल्ल्यात सोने तेजीत राहण्याची शक्‍यता 
मुंबई: जागतिक चलनबाजारातील ओढाताण आणि जागतिक व्यापारयुद्धामुळे देशोदेशीच्या रिझर्व्ह बॅंका सोने खरेदीत वाढ करीत आहेत. त्याचबरोबर सोन्याच्या दरात मध्यम पल्ल्यात तरी वाढ होण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेनेही गेल्या दशकभरात पहिल्यांदाच सोन्याची खरेदी केली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार गेल्या वर्षात 8.46 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करण्यात आली असून मध्यवर्ती बॅंकेकडील एकूण सोन्याचा साठा 566.23 मेट्रिक टनवर पोहोचला आहे.
30 जून 2017 रोजी आरबीआयकडे सोन्याचा साठा 557.57 मेट्रिक टन होता. भारताच्या विदेशी चलन संपत्तीमध्ये विविध प्रकारात गुंतवणूक असणे आणि धोक्‍याचे नियंत्रण करण्यासाठी ही गुंतवणूक वाढविण्यात आली आहे. यापूर्वी आरबीआयने नोव्हेंबर 2009 मध्ये 200 मेट्रिक टन सोन्याची खरेदी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून केली होती. आरबीआय कायद्यानुसार नियमित सोन्यामध्ये व्यवहार करण्याची बॅंकेला जरी परवानगी असली तरी बॅंकेकडून तसे करण्यात येत नाही. पीपल्स बॅंक ऑफ चायना आणि बॅंक ऑफ रशियाकडून सोन्यामध्ये नियमित व्यवहार करण्यात येतात. अन्य क्षेत्रांतून मिळणाऱ्या परताव्याचे प्रमाण घटल्यास पुन्हा सोन्याच्या मागणीत वाढ होईल, असे बॅंकेला वाटते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थैर्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)