रिझर्व्ह बँकेचा एसएमएस तुम्हाला आला का?

नवी दिल्ली : दहा रुपयांच्या कॉईन बद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अफवा पसरलवल्या जात आहेत. मात्र नागरिकांनी त्यापासून दूर राहावे, यासाठी रिझर्व्ह बँकेने आता सर्व बँकांच्या ग्राहकांना एसएमएस पाठवून जनजागृती सुरू केली आहे.

दहा रुपयांच्या सर्व नाणी वैध असल्याचे मोबाइल संदेश रिझर्व बँकेकडून सर्वांना पाठवले जात आहेत. दहा रुपयांची नाणी बंद होणार किंवा बंद झाली आहेत, याबद्दलच्या अफवा, गैरसमज थांबवण्यासाठी हा एसएमएस पाठवला जात आहे.

राज्यभरातील अनेक शहरांत व्यापाऱ्यांनी १० रुपयांचे कॉईन स्वीकारणे बंद केले होते. ही बाब रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी प्रत्येक बँकेत याबद्दल गैरसमज दूर करण्याचे आवाहन करणारे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही अफवा सुरूच राहिल्याने आता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)