रिक्‍त मागासवर्गीय अनुशेष भरा!

पिंपरी- झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभागांतर्गत वाटप केलेल्या सदनिकांचा मिळकत कर वाजवी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टयांचे पुर्नवसन एसआरए स्किम राबवाव्यात, महापालिकेमधील वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा रिक्‍त अनुशेष भरावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्यस्तरिय अधिवेशनाकरिता तेशहरात आले होते. तत्पूर्वी चिंचवड येथील एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मागासवर्गीय अनुशेष भरती व शहरातील एसआरए स्किमची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, स्मिता झगडे, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रिपाइंचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब भागवत, अजीज शेख आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व सफाई कर्मचारी तथा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा अनुशेषासंदर्भातील माहिती रामदास आठवले यांनी जाणून घेत, महापालिकेच्या संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.

शहरातील एसआरए स्किमकरिता बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी आठवले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर हे काम करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन, काही बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. याशिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील राज्य सरकारकडून नोकर भरतीला “ग्रीन सिग्नल’ मिळत नसल्याने, सर्वच संवर्गातील मनुष्यबळ भरती रखडल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)