रिक्षा पलटी होवून एक जखमी

विडणी, दि. 5 (वार्ताहर) -महाड-पंढरपूर महामार्गावर विडणीनजीक असलेल्या राऊरामोशी पुलाच्या वळणावर अ‍ॅपेरिक्षा पलटी होऊन एकजण जखमी झाला. आज दुपारी 1.30 च्या सुमारास पंढरपूरहून फलटणकडे गॅसच्या शिगड्या घेऊन निघालेली तीनचाकी अ‍ॅपे कंपनीची रिक्षा राऊ-रामोशी पुलाच्या वळणावर जवळ आली असता अचानक कुत्रे आडवे गेल्याने झालेल्या अपघातात वळणावरच पलटी झाली. यामध्ये रिक्षाचालक नितिन धोतरे (वय – 49) रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर हे किरकोळ जखमी झाले. यामध्ये आणखी दोनजण होते. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र नवीनच घेतलेल्या रिक्षाचे शेगड्यांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)