रिक्षा-नॅनोच्या धडकेत वृद्ध ठार

पिंपरी – भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने नॅनो कारला धडक दिली. त्यामुळे नॅनो कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारमधील जखमी झालेल्या वृद्ध चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात प्राधिकरण निगडी येथील भेळ चौकात झाला.

कालिदास काळोखे (वय 63) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. विनय शंकर काळोखे (वय-60, रा. सेक्‍टर नं 26, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिदास हे नॅनो कार घेऊन भेळ चौकातून जात होते. त्यावेळी आलेल्या भरधाव वेगातील रिक्षाची कालिदास यांच्या कारला धडक दिली. यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात कालिदास यांच्या हनुवटी व छातीला मार लागला. त्यातच ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)