रिक्षा चालक-मालक संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

कराड – शहर व तालुक्‍यातील रिक्षा व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी शहरातून आरटीओ कार्यालयापर्यंत मोर्चा काढून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस निरीक्षक आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला निवेदन दिले.

रिक्षा व्यवसायिकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, बेकायदेशीर वाहतूक बंद करावी, ऑटो रिक्षाचे वाढीव इन्शुरन्स दर कमी करावेत, ऑनलाइन मुक्त परवाने वाटप त्वरित बंद करावे, आरटीओ बोर्ड मीटिंगमध्ये रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सहभागी करून घ्यावेत, रिक्षा स्क्रॅप व पासिंग शुल्क समान ठेवावे, रिक्षा चालकांना पब्लिक सर्व्हन्टचा दर्जा द्यावा, इलक्‍ट्रिक मीटरची सक्ती नसावी, विनापरवाना परजिल्ह्यातील वाहनांवर कारवाई करावी, नवीन रिक्षा थांबे मंजूर करावेत, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परमिट देण्यामध्ये असणारी तफावत संपुष्टात आणावी, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटनेने मंगळवारी दत्त चौक-आरटीओ कार्यालय, असा मोर्चा काढला.

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष गफ्फार नदाफ, उपाध्यक्ष विजय लोखंडे, हिम्मत मुजावर, रहीम पटेल, भागवत गरुड, फिरोज कच्ची, विनायक मोरे, बबलू मुल्ला, सुनील पाटील यांच्यासह रिक्षा मालक-चालक मोर्चात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)