रिक्षा चालकांसाठी लवकरच महामंडळ

पिंपरी – महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. लवकरच महामंडळाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाचा लाभ देण्यात येईल, असे आश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत, अशी माहिती ऑटो रिक्षा कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

याबाबत मुंबई येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत संघटना पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार गौतम चाबुस्कर, पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत कल्याण डोंबवली जिल्हा अध्यक्ष शिवाजी गोरे, राजू भोसले, विश्वनाथ ठाकुर आदी उपस्थित होते. यावेळी बाबा कांबळे यांनी कल्याणकारी मंडळाची घोषणा केल्याबद्दल शासनाचे आभार मानले.

लवकरच महामंडळाचे गठण करून अंमलबजावणी करू आणि रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाचा लाभ देऊ, असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. रिक्षा चालकांच्या सूचना आणि यांचे प्रश्न समजून घेऊन सर्व प्रश्न मंडळाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करू, यासाठी लवकरच महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनांची बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिले,

महाराष्ट्र शासनाचे रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालकांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आम्हालाही सन्मानाने जगता येईल, अशी भावना निर्माण झाली आहे. परंतु, सरकारने तातडीने मंडळाचे गठन करावे आणि रिक्षा चालकांना लाभ द्यावा, असे मत बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)