रिक्षा चालकांनी वाचला समस्यांचा पाढा

पिंपरी – रिक्षा चालक, मालकांच्या प्रश्‍नावर राज्यभरातील रिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक मुंबई बांद्रा येथील परिवहन आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी रिक्षा संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक काळ या बैठकीत चर्चा झाली.
नवीन परवाना वितरण बंद करणे, रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभाग अंतर्गत कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत, पासिंग ट्रॅकचा प्रश्‍न मार्गी लावावा, ओला-उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करावी, तसेच बजाज कंपनी आणि त्यांच्या डिलरवर कारवाई करावी, यासह विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.

या वेळी शशांक राव म्हणाले की, आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आमच्याशी चर्चा केली. मात्र, बैठकीत ठरल्या प्रमाणे निर्णय न झाल्यास जानेवारीत आंदोलनाची तीव्रता वाढविली जाणार आहे. आंदोलन करण्यात येईल. याशिवाय नुसत्या चर्चेने आमचे प्रश्‍न सुटणार नाहीत, असे मत विलास भालेकर यांनी मांडत, आश्‍वासनाची पूर्तता झाली पाहिजे, अशी मागणी केली.

बजाजच्या डीलर्सनी आरटीओ पासिंगच्या नावाखाली केलेल्या अपहाराची माहिती आनंद तांबे यांनी पुराव्यांसह सादर केली. तसेच गेली 15 महिन्यांपासून तक्रार करूनही कारवाई न केल्याची बाब निदर्शनास आणून देत, यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. रिक्षा चालकांचे प्रश्‍न ऐकून चर्चा घेत, या सर्व प्रश्‍नांवर चन्ने यांनी सकारात्मक चर्चा केली. या सर्व मागण्या सरकारी दरबारी मांडून, त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष गफरभाई नदाफ, मारुती कोंडे, प्रमोद घोणे, सहसचिव मच्छिंद्र कांबळे, महेश चौगुले, प्रदेश सदस्य आनंद तांबे, फिरोज मुल्ला, सुरेश गलांडे, भारत नाईक, सुनिल बोर्डे, राजेश बुटले, महादेव विभूते, स्वामी बल्लूर, सुनील पाटील, आनंद चौरे, लखन लोंढे, तुषार मोहिते, आरिफ शेख, इम्रान सय्यद, बालन मुजावर, अशोक इंगळे, जावेद पटवेगर, मोहसीन पठाण, संजय चव्हाण, युनूस तांबोळी, सुखदेव कोळी, उदय कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)