रिक्षा चालकांच्या प्रश्‍नांसाठी मुंबईत बैठक

पिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा संघटनेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नुकतीच मुंबई मंत्रालय येथे परिवहन आयुक्त दिवाकर रावते यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालकांच्या रिक्षा पासिंगसाठी येणाऱ्या अडचणी सोडविणे, ऑनलाईन परमिट आणि टॅक्‍ससाठी येणाऱ्या अडचणी सोडविणे; तसेच ओला-उबेरसाठी नियमावली तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, ट्रक ट्रान्स्पोर्ट महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, आनंद तांबे, विजय रवळे, बापू भावे उपस्थित होते.

परिवहन खात्यांतर्गत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. ओला-उबेरबाबत लवकरच नियमावली तयार करण्यात येईल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. मोशी येथील रिक्षा पासिंग ट्रॅकवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व रिक्षा पासिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)