रिक्षा कृती समितीची राज्य कार्यकारिणी जाहीर

पिंपरी – ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या अध्यक्षपदी कामगार नेते शशांक राव तर सरचिटणीसपदी पिंपरी-चिंचवडमधील बाबा कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पिंपरी येथे नुकतीच पार पडली. यावेळी जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष – शशांक राव (मुंबई), सरचिटणीस – बाबा कांबळे (पुणे), कार्याध्यक्ष – विलास भालेकर (नागपूर), संपर्क प्रमुख – नरेंद्र गायकवाड (नांदेड), उपाध्यक्ष- मारुती कोडे (नवी मुंबई), गफार नदाफ (कराड), प्रल्हाद सोनवणे (जळगाव), प्रमोद घोणे (मुंबई), शिवाजी गोरे (कल्याण-डोंबिवली) सहसचिव – विजय खेतले (वसई विरार), महेश चौगुले (सांगली), तानाजी मालसकर (सोलापूर), वैजनाथ देशमुख (नांदेड), राहुल कांबळे (कल्याण डोंबवली), मच्छिंद्र कांबळे (लातूर), अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र महिला – शिला डावरे, सल्लागार – मधुकर थोरात, कार्यकारिणी सदस्य – सुरेश गलांडे (सांगली), इलियास लोधी खान (अकोला), सुनील बोर्डे (नवी मुंबई), ज्ञानेश्‍वर सोनवणे (कल्याण-डोंबिवली), सुग्रीव शिंदे (बीड), फिरोज मुल्ला (सांगली), जिल्हा निरीक्षक – अशोक सळेकर (अहमदनगर), आनंद तांबे (सोलापूर), नितीन शिंदे (नाशिक), विजय पाटील (जळगाव), बाळू फाळके (सांगली), मोश्‍वर लोकरे (विदर्भ), सुरेश शिंदे (उस्मानाबाद), गणेश जाधव (रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग), बालाजी कोकरे (नांदेड), राजू बुटाले (सांगली), नरेंद्र गायकवाड (लातूर-जालना), वैजनाथ देशमुख (परभणी-हिंगोली), गजानन बाबर (सातारा), आरिफ शेख (कोल्हापूर).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)