रिक्षाला कारची धडक

विडणी – 22 फटयानजीक (माळेगाव) जि.पुणे येथे सहा सीटर रिक्षाला भरधाव कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला तर रिक्षातील महिला व मुलांनाही काही प्रमाणात इजा झाली. अपघातानंतर कारचालकांने न थांबता घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, तेथूनच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे कार्यकर्त्यांसह बारामतीच्या एका लग्नसमारंभासाठी निघाले होते. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला दूरध्वनीवरून संपर्क साधून पाचारण केले. यावेळी सुबोध शिर्के, पंकज शिंदे, राहुल शिर्के यांचेही योगदान राहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)