रिक्षातून आलेल्यांनी मोबाइल हिसकावला

पुणे- शिक्षातून आलेल्या दोन व्यक्तींनी कुठे जायचे आहे, अशी विचारणा करीत पायी जात असलेल्या एकाच्या खिशातून मोबाइल हिसकावल्याची घटना हडपसर, गाडीतळ येथे सोमवारी (30 जुलै) मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली.
महादेव लोभे (वय 34, रा. साईनाथनगर, खराडी) यांनी याप्रकरणी हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातून आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी रिक्षातून येत कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली, त्यानंतर फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांच्या खिशातील 8 हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावला. त्यानंतर फिर्यादींना धक्का मारून दोघे फरार झाले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)