रिक्षातील महिलेची पर्स हिसकावली

पुणे,दि.13- रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स हिसकावून 16 हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास डेक्कन येथील संभाजी उद्यान येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकासह दोघांविरुध्द डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी 27 वर्षीय महिला स्टेशन परिसरातून सकाळी साडेसहावाजता रिक्षाने सदाविश पेठेत चालली होती. यावेळी तीने मांडीवर पर्स ठेवली होती. दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रिक्षाचा वेग संभाजी उद्यान येथे कमी होताच तीच्या मांडिवरील पर्स हिसका मारुन चोरली. यामध्ये रोख सात हजार, मोबाईल व कागदपत्रे असा 16 हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर.ए.कोळंबीकर तपास करत आहेत.
* गस्त वाढवूनही घटना थांबेनात *
साखळी चोरांसारखी कार्यपध्दती अवलंबवत सकाळच्या वेळी रिक्षातील महिलांच्या पर्स चोरण्याच्या घटना शहरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून होत आहेत. शिवाजीनगर ते वारजे या मार्गावर बहुतांश घटना घडल्या आहेत. रिक्षाचा वेग कमी होताच दुचाकीवरुन आलेले चोरटे पर्स हिसकावून पळ काढतात. या गुन्हेगारांचा माग अद्यापही पोलिसांना लागला नाही. पोलीस उपायुक्त बसवराज तेली यानी हे प्रकार रोखण्यासाठी दोन आठवड्यापुर्वीच सकाळच्या वेळेत गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गस्त वाढवली गेली तसेच अनेकदा नाकाबंदीही करण्यात येत. मात्र असे असूनही पर्स चोर पोलिसांच्या जाळ्यात सापडले नाहीत. येरवडा, नळस्टॉप, कोथरुड व स्वारगेट परिसरास अशा घटना घडलेल्या आहेत. यासंदर्भात संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहे.
याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर.ए.कोळंबीकर करत आहेत.

दरम्यान डेक्‍कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारीच सकाळी सहा वीसच्या सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीची 60 हजाराची सोनसाखळी हिसका मारुन चोरण्यात आली. याप्रकरणी अभिजीत देशपांडे ( 50, रा.डेक्कन) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार दुचाकीवरी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)