रिक्षातील महिलेची पर्स दुचाकीस्वारांनी चोरली

पुणे – रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेची 6 हजार 590 रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरण्यात आली. ही घटना शिवाजीनगर येथील बर्वे चौकात सकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रामचंद्र न्यायाधीश (49, रा. औरंगाबाद) हे पत्नीसह औरंगाबादहून शिवाजीनगरला उतरले होते. ते पत्नीसह रिक्षाने नातेवाईकांकडे एका कार्यक्रमानिमित्त चालले होते. त्यांच्या पत्नीने रिक्षाच्या सिटवर मध्यभागी पर्स ठेवली होती. त्यामध्ये रोख 490 रुपये, एक मोबाईल व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा 6590 रुपयांचा ऐवज होता. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची ही पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली.

यानंतर चोरटे दुचाकीवरुन जंगली महाराज रस्त्याने सुरभी हॉटेलच्या रस्त्याने निघुन गेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. काळे तपास करत आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)