रिक्षा,जीप व्यावसायिकांसाठी सर्वपक्षीयांचा पुढाकार

स्क्रॅपची मुदत वाढविण्याची मागणी

सातारा – सोळा वर्षे पुर्ण झालेली रिक्षा व 20 वर्ष पुर्ण झालेली जीप स्क्रॅप करण्याच्या निर्णयाला सर्व पक्षीय व संघटनांनी विरोध केला आहे. साताऱ्याची भौगोलिक स्थिती व वाहनाचा वापर लक्षात घेवून स्क्रॅप करण्याची मुदत वाढविण्याची मागणी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व सातारा जिल्हा रिक्षा, टॅक्‍सी व जीप युनियनचे अध्यक्ष दिपक पवार, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, खा.उदयनराजे समर्थक व सातारा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, आ.शिवेंद्रसिंहराजे समर्थक व नगरसेवक बाळासाहेब खंदारे आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या डोंगरी आहे तसेच जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही. त्यामुळे वाहनांचा वापर पुरेसा झालेला नाही. तसेच सातारा जिल्ह्यात समुद्र किनारा व दमट हवामान नसल्यामुळे वाहने खराब होण्याची शक्‍यता अल्प आहे. परिणामी त्या वाहनांपासून कोणतेही प्रदूषण होत नाही.तर रिक्षा चालकांनी पर्यावरण कर 20 वर्षाचा भरलेला आहे. त्यामुळे एवढ्या लवकर वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय उचित ठरणारा नाही. त्यात शासनाने परवाने खुले केल्यामुळे त्याचा परिणाम जुन्या व्यवसायिकांवर झालेला आहे. या सर्व बाबींचा शासनाने विचार करून निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आबिद सय्यद, गणेश भिसे, संजय साळुंखे यांच्यासह रिक्षा व्यवसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा व्यवसायिकांवर वेळ
इतर वाहनांची 20 वर्ष पुर्ण झाल्यानंतर रिपासिंग करण्यात येते. त्याप्रमाणे रिक्षाचे देखील करण्यात यावे. किमान 20 वर्षापर्यंत मुदत वाढवून येत्या कालावधीत रिक्षा व्यवसायिकाला नविन वाहन खरेदी करण्यासाठी शासनाने कर्ज उपलब्ध करून द्यावे. मात्र, शासन जर आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर जी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ती वेळ रिक्षा व्यवसायिकांवर येवू शकेल, असे मत चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)