रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मत्यू

पिंपरी, (प्रतिनिधी) – भरधाव रिक्षाची धडक बसल्याने एका पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. विठाबाई तुकाराम साळुंखे (वय 60) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.19) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास म्हाळसाकांत कॉलेज ते आकुर्डी रोडवरील श्रीकृष्ण गॅरेजसमोर घडली. सुलक्षणा गायकवाड (वय 45, रा, विठ्ठलनगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून रिक्षा क्र (एमच 12 एचसी 2022) वरील चालकावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायकवाड या आपली आई विठाबाई यांच्यासोबत गंगानगर येथील स्वामी समर्थ मठातून दर्शन घेऊन घरी पायी परत चालल्या होत्या. श्रीकृष्ण गॅरेजजवळ आल्या असताना, भरधाव आलेल्या रिक्षाने विठाबाई यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)