सातारा : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा ,प्रवाशाची पर्स केली परत

सातारा, (प्रतिनिधी)

प्रवासादरम्यान रिक्षात पर्स विसरून गेलेल्या प्रवाशाला चालकाने मोठा दिलासा दिला आहे. चालकाने पैसे व मोबाईल असलेली पर्स स्वतः शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे वनिता वसंत कुलकर्णी रा.बागलकोट कर्नाटक यांना त्यांचे दोन मोबाईल व पैसे परत मिळाले. प्रवासादरम्यान रिक्षात पर्स विसरून गेलेल्या प्रवाशाला चालकाने मोठा दिलासा दिला आहे. चालकाने पैसे व मोबाईल असलेली पर्स स्वतः शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे वनिता वसंत कुलकर्णी रा.बागलकोट कर्नाटक यांना त्यांचे दोन मोबाईल व पैसे परत मिळाले .कुलकर्णी या सोमनाथ भाग्यवंत कुंभार यांच्या रिक्षातुन सातारा शहरातुन प्रवास करीत असताना त्या पर्स रिक्षात विसरल्या होत्या.

कुंभार यांना रिेक्षात पर्स मिळून आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली होती.त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कुलकर्णी यांचा शोध घेत त्यांची पर्स परत केली. रिक्षाचालक कुभांर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पो.नि किशोर धुमाळ व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)