रिकामाच्या दालनात वीज, पंखे सुरू

कराड : पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात कोणीही उपस्थित नसताना सुरु असलेले विजेचे बल्ब व फॅन.

पंचायत समितीमधील प्रकार

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) – कराड पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचायत समितीतील सर्व कर्मचाऱ्यांचा लवाजमाही सदस्यांना सेवा पुरवण्यासाठी सभेच्या ठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे सभापतीच्या बैठकीच्या दालनातील सुरू असलेल्या विजेचे बल्ब व फॅनकडे कोणाचेही लक्ष नव्हते. एकीकडे तालुक्‍यात वीज बचतीचे महत्त्व सांगितले जाते. काही ठिकाणी वीज वितरण विभागाकडून कारवाईही केली जाते. मात्र, पंचायत समितीमध्येच त्यास हरताळ फासला जात असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)