रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? (भाग-१)

ज्यांच्या हातात अधिक पैसा येत नाही, पण महिन्याला नियमित वेतन मिळते, त्यांच्यासाठी कोणतीही जोखीम नसलेले रिकरिंग डिपॉझिट खाते हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे.

बहुतेक बँकांमध्ये रिकरिंग डिपॉझिटची सुविधा असते. ज्याप्रमाणे विशिष्ट व्याजदराने मुदत ठेव बँकेत ठेवली जाते तशीच पद्धत रिकरिंग ठेवींची असते. सामान्य माणसाला एकदम मोठ्या रकमेची मुदत ठेव करता येत नाही. त्यामुळे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार दरमहा विशिष्ट रक्कम ठेव म्हणून ठेवता येते. त्यावर वार्षिक ५.२५ ते ७.९० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. नोकरदार आणि छोट्या व्यावसायिकांसाठी रिकरिंग पद्धतीने पैशाची बचत करून मोठी रक्कम उभी करणे शक्य होते.

मुदत ठेवींप्रमाणेच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दरमहा ठराविक रक्कम बँकेत किंवा टपाल कार्यालयात ठेवू शकता. सध्याच्या काळात तुमच्या बचत खात्यातून ठरलेल्या तारखेला ही रक्कम इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्सद्वारे तुमच्या ठेव खात्यात वळती होते. ही रक्कम फक्त दरमहा जमा होते. यामध्ये दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला अशी सुविधा नसते.

किती रक्कम गुंतवता येते?

बहुतेक बँकांमध्ये दरमहा कमीत कमी पाचशे रुपयांच्या रिकरिंग डिपॉझिटची सुविधा असते. त्यामुळे शक्यतो पाचशे किंवा पाचशेच्या पटीत रिकरिंग डिपॉझिटची रक्कम असावी. काही बँकांमध्ये पाचशेच्या पुढे शंभरच्या पटीतही ही रक्कम ठेवता येते. यासंदर्भात तुमचे बचत खाते असलेल्या बँकेचे काय धोरण आहे याची माहिती घ्या.

किती कालावधीसाठी गुंतवता येते?

सर्व प्रकारच्या आरडीसाठी कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी असतो. त्यामध्ये तीनच्या पटीत वाढ करता येते. म्हणजे नऊ महिने, बारा महिने असा कालावधी असू शकतो. जास्तीत जास्त दहा वर्षांसाठी (१२० महिने) आरडी करता येते. आरडीचा कालावधी किती असावा हे तुम्हांला निश्चित करता येते.

व्याजदर काय असतो?

आरडी खात्यातील रकमेवर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर रिझर्व्ह बँकेच्या प्राईम रेटशी निगडीत असतो. दर तीन महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने हे व्याज तुमच्या आरडी खात्यात जमा होते. सध्या आरडीवरील व्याजाचा दर ७.५ ते ९.०० टक्क्यांपर्यंत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.२५ ते ०.७५ टक्के जास्त व्याजदर मिळतो. आरडी खाते सुरु करण्यापूर्वी बँकेत व्याजदराविषयी चौकशी करावी.

रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? (भाग-२)

मुदतीपूर्वी पैसे काढता येतात का?

तुम्ही तुमच्या आरडी खात्यात ठरलेली रक्कम जमा करणे कधीही थांबवू शकता आणि कधीही खात्यातील रक्कम काढू शकता. परंतु मुदतीपूर्वी खाते बंद केल्यामुळे पेनल्टी म्हणून एक टक्का रक्कम तुमच्याकडून घेतली जाते. मात्र तुम्ही जी रक्कम भरलेली आहे म्हणजेच मुद्दल; ते कमी होत नाही.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)