रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? (भाग-२)

ज्यांच्या हातात अधिक पैसा येत नाही, पण महिन्याला नियमित वेतन मिळते, त्यांच्यासाठी कोणतीही जोखीम नसलेले रिकरिंग डिपॉझिट खाते हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे.

रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? (भाग-१)

नॉमिनेशन सुविधा

-Ads-

आरडी खात्याला नॉमिनी किंवा बेनिफिशियरी म्हणून तुम्ही हव्या त्या व्यक्तीचे नाव लिहू शकता. त्यानॉमिनीचे नाव कधीही बँकेकडे योग्य ती कागदपत्रे सादर करून बदलूही शकता. अल्पवयीन म्हणजेच अठरा वर्षाखालील अपत्याच्या नावानेदेखील आरडी खाते काढता येते. त्याच्याबरोबर सहखातेदार म्हणूनही आणखी कुणाचे नाव समाविष्ट करता येते.

हप्ता भरण्यास उशीर झाला तर काय होते?

तुम्ही जेव्हा आरडी खाते सुरु करता तेव्हा तुमचा महिन्याचा हप्ता ठरलेला असतो आणि व्याजाची रक्कमही निश्चित असते. त्यामुळे ठरलेल्या कालावधीनंतर आरडी खाते बंद केल्यावर हातात किती रक्कम पडणार हे तुम्हांला सांगितले जाते. त्यामुळे हप्ता भरण्यास एक दिवस उशीर झाला तरी त्यावर मिळणाऱ्या व्याजाबाबत तुम्हांला संपूर्ण महिन्याची पेनल्टी लागू शकते किंवा त्या हप्त्याच्या प्रमाणात दंड केला जाऊ शकतो. काहीही झाले तरी तुम्हांला शेवटी मिळणाऱ्या रकमेवर त्याचा परिणाम होतो. सलग सहा महिने पैसे भरण्यास उशीर झाला तर काही बँका असे खाते बंद करण्याचा अधिकार राखून ठेवतात.

खात्यातून काही रक्कम काढता येते का?

नाही. आरडी खात्यातून कधीही निम्मी किंवा गरजेएवढी रक्कम काढता येत नाही. तुम्ही मुदतीपूर्वी खाते बंद केले तर तोपर्यंतचे व्याज धरून रक्कम मिळते. मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास काही दंडाची तरतूद असेल तर ती दंडाची रक्कम तुमच्या रकमेतून वळती करून घेतली जाते.

आरडी खात्याचे फायदे

तुमच्या आरडी खात्यात जितकी रक्कम जमा आहे त्याच्या ९० टक्के रक्कम तुम्हांला कर्ज म्हणून मिळू शकते. त्याचे व्याजही पर्सनल लोनवरील व्याजापेक्षा कमी असते. साधारणपणे बँक आरडीवर जेवढे व्याज देते त्यापेक्षा एक टक्का जास्त व्याज असते. टपाल कार्यालयातील पाच वर्षांच्या आरडी योजनेत गुंतवणूक केली तर प्राप्तीकर कायद्यातील ८० सी कलमानुसार रु. एक लाखापर्यंत करकपातीचा लाभ मिळू शकतो.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)